नाशिक : शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि रस्ते अपघातात होणारे मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी पुन्हा नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी शहरात ५२ ठिकाणी नाकाबंदी करून विना हेल्मेट दुचाकी चालविणाºयांवर कारवाईचे आदेश दिले आहे. दरम्यान, शहरातील वर्दळीच्या मुख्य चौकांमध्ये पोलीसांनी नाकाबंदी करुन हेल्मेट न वापरणाºया वाहनाचलकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. हेल्मेट वापरणाºया नाशिककरांच्या संख्येत वाढ झाली असली तरी, अद्यापही काही हौशी तरुण मंडळी हेल्मेटच्या वापराकडे दुर्लक्ष करीत बेसावध व बेदरकारपणे वाहन चालविताना नजरेस पडत आहेत. पोलीस आयुक्तांनी सदर बाब लक्षात घेऊन विना हेल्मेट एकही नाशिककर रस्त्यावर दुचाकी चालविताना आढळून येता कामा नये, यासाठी कारवाईचे आदेश दिले आहे.
एकूणच ‘हेल्मेट ना रहेने पर हम पुलीस से तो बहस कर सकते हैं, पर यमराज से नहीं’ या घोषवाक्यात हेल्मेटचे अत्यंत मार्मिक पध्दतीने महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. वाक्याच्या सुरूवातीच्या अर्थानुसार चित्र शहरात आज पहावयास मिळत आहे.