नाशिक : आंतरधर्मीय विवाहाला पाठबळ पुरवून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यामुळे समाजातील एका पदाधिकाऱ्याचे ह्दयविकाराच्याधक्क्याने निधन झाले आहे. तसेच संपूर्ण सुवर्णकार समाजात या घटनेने असंतोष पसरण्यासह समाजभावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणातराज्यमंत्री कडू यांनी समाजाची ३० जुलैच्या आत जाहीर माफी न मागितल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष गजू घोडके यांनी दिला आहे.राज्यमंत्री कडू यांनी ह्यकोण लग्न रोखतो ते मी पाहतो, मी लग्नात येऊन नाचणार असे आव्हान देऊन एकप्रकारे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.त्यामुळे आता समाजाचे समाधान होईपर्यंत ही लढाई सुरूच राहणार असल्याचेही घोडके यांनी जाहीर केले. संपूर्ण समाजाला डावलून एकतर्फी निर्णय घेणे कितपत योग्य आहे, असा सवालदेखील घोडके यांनी केला आहे.
आमचा लग्नाला विरोध नव्हता. मात्र, दिव्यांग कन्येशी लग्न करायला समाजातील कुणीच मुलगा नाही, हा मुलीच्या वडिलांचा दावा चुकीचा होता. त्यांनी चर्चा केली असती तर मुलीसाठी समाजातील शंभर मुले विवाहासाठी दाखवली असती. मात्र, त्यांनी तसे केले नाही. त्यानंतर कडूंनी विनाकारणच प्रकरणात हस्तक्षेप केला. त्यामुळे राज्यभरातील समाजबांधवांनी काळ्या फिती लावून कडू यांचा निषेध करण्याचे आवाहनदेखील घोडके यांनी केले. तसेच दरम्यानच्या काळात आमदार कपिल पाटील यांनीदेखील मुलीच्या वडिलांची भेट घेऊन त्यांचे समर्थन केले.त्यामुळे आमदार पाटील यांनीदेखील समाजाची माफी मागावी, अशी मागणीही घोडके यांनी केली. आम्ही व्यापारी समाजातील माणसे आहोत. मात्र, समाजाविरुद्ध कुणी वक्तव्य करणार असतील, तर राज्यव्यापी बंद पुकारून आमची ताकद दाखवून देऊ, असा इशाराही घोडके यांनी दिला आहे.