शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

उद्या ‘मुहर्रम’चे चंद्रदर्शन घडल्यास नववर्ष हिजरी सन १४४०ला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 4:55 PM

इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४०ला सोमवारी (दि.९) संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रदर्शन घडल्यास मुस्लीम बांधवांच्या नववर्षाचा पहिला महिना ‘मुहर्रमुल हराम’ला सुरूवात होईल.

ठळक मुद्देदहा दिवसीय प्रवचनमालांचे आयोजन ‘इमामशाही’मध्ये सोहळा, यात्रोत्सवाला हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरायावर्षी मुहर्रम, गणेशोत्सव एकाच कालावधीत

नाशिक : इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४०ला सोमवारी (दि.९) संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रदर्शन घडल्यास मुस्लीम बांधवांच्या नववर्षाचा पहिला महिना ‘मुहर्रमुल हराम’ला सुरूवात होईल. मुहर्रमनिमित्तमुस्लीमबहूल परिसरात विविध धार्मिक संघटनांच्या वतीने दहा दिवसीय प्रवचनमालांचे आयोजन करण्यात आले आहे.इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचे नातू शहीद-ए-आजम हजरत इमाम-ए-हुसेन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी मुस्लीम बांधव मुहर्रमच्या सुरूवातीच्या दहा दिवसांमध्ये ‘करबला’च्या स्मृतींना उजाळा देतात. इस्लामी कालगणना चंद्रदर्शनावर अवलंबून असल्यामुळे प्रत्येक महिन्याच्या २९ तारखेला चंद्रदर्शन घेऊन महिना बदलला जातो. चंद्रदर्शन न घडल्यास चालू महिन्याचे तीस दिवस पूर्ण करुन पुढचा महिना सुरू होतो. मुहर्रमला धार्मिकदृष्टया अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. मुहर्रमच्या दहाव्या दिवशी मुस्लीम बांधवांकडून आशुराचे नमाजपठण व प्रार्थना केली जाते. या महिन्याचा दहावा दिवस ‘आशुरा’म्हणून पाळला जातो. या दिवशी समाजबांधवांकडून ठिकठिकाणी सामुहिकरित्या सरबतचे वाटप केले जाते.यावर्षी मुहर्रम आाणि गणेशोत्सव हे दोन्ही सण एकाच कालावधीत साजरे होत असल्याचा दुर्मीळ योग जुळून आला आहे. एकात्मता सामाजिक बांधिलकी व जातीय सलोखा कायम जोपासावा असाच संदेश दोन्ही समाजांसाठी हा योग देऊन जाणारा आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवदेखील बारा दिवस साजरा होतो आणि मुहर्रमचे सुरूवातीचे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आणि या कालावधीत करबलाच्या स्मृती जागविल्या जातात. धर्मगुरूंकडून प्रवचनातून त्याबाबत प्रकाश टाकला जातो.

‘इमामशाही’मध्ये सोहळासारडासर्कल येथील हजरत सय्यद इमामशहा बाबा यांच्या दर्ग्याच्या आवारात मुहर्रमच्या कालावधीत दहा दिवस मोठी लगबग पहावयास मिळते. येथील मानाचा अळीवपासून (हालौ) तयार केला जाणारा ताबूत प्रसिध्द आहे. हा ताबूत तयार करण्यासाठी सय्यद कुटुंबियांकडून प्रारंभ क रण्यात आला आहे. बांबुचा वापर करत त्यावर कापूस लावून तो पाण्याने भिजवीला जातो आणि त्यामध्ये अळीवच्या बिया पेरल्या जातात. मुहर्रमच्या नवव्या दिवसापर्यंत या ताबूताला पुर्णत: हिरवळीचा साज चढलेला पहावयास मिळतो. शेवटचे दोन दिवस या ठिकाणी यात्रोत्सव साजरा केला जातो. या यात्रोत्सवाला हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा लाभली आहे.

टॅग्स :muharramमुहर्रमNashikनाशिकMuslimमुस्लीम