नाशिक : जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा न देता पुढील वर्गात आले आहेत. त्यांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी कोरोनाच्या संकटामुळे प्रत्यक्ष वर्ग सुरू झालेले नाहीत. शाळा बंद असल्याने आॅनलाइन शिक्षणाचे प्रयोेग सुरू झाले आहेत. परंतु, या मुळे अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन नसलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.नाशिक जिल्ह्यात विविध शिक्षण मंडळांशी संलग्न वेगवेगळ्या व्यवस्थापनाच्या एकूण १ हजार २७१ शाळा आहेत. त्यापैकी ४६७ शाळांमध्ये आॅनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहेत, तर २० शाळांना विविध तांत्रिक कारणांमुळे आॅनलाइन शिक्षण सुरू करता आलेले नाही, तर उर्वरित ७८४ शाळांमधील विद्यार्थ्यांना या आॅनलाइन शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर राहावे लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ३१ जुलैपर्यंत प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील वर्ग भरणार नाहीत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने विद्यार्थांचे लर्निंग फ्रॉम होम शिक्षण सुरू ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने सूचना केल्या आहेत. मात्र आॅनालाइन शिक्षण देणे शक्य होत नसल्याचे वास्तव आहे. ज्या पालकांकडे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. ते नेहमी घरीच असतात असे नाही, नोकरी व्यवसायानिमित्त पालक घराबाहेर असतात. त्यामुळे मुलांना स्मार्टफोनची उपलब्ध होतोच असे नाही. अशा विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांनी नेमकी कोणती वेळ निवडावी हा प्रश्न निर्माण झाला आहे.प्राथमिक विद्यार्थ्यांचा प्रश्न अधिक गंभीरमाध्यमिकच्या विद्यार्थ्यांना किमान स्मार्टफोन हाताळता येतो. त्यामुळे त्यांना आॅनलाइन वर्गात सहभागी होता येते. मात्र प्राथमिक विद्यार्थ्यांना स्मार्टफोन हाताळतानाही अडचण येत असल्याने पालकानाही वर्ग सुरू असताना विद्यार्थ्यांसोबत थांबावे लागते. त्यामुळे एकीकडे पालकांचे नियोजन कोलमडते, तर दुसरीकडे शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अनेक पालकांकडे स्मार्टफोनच उपलब्ध नसल्याने प्राथमिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.सरकार याचा विचार करणार काकामावर जाताना अनेक पालक त्यांचे स्मार्टफोन सोबत घेऊन जातात. ते परतल्यानंतरच पाल्यांना स्मार्टफोन उपलब्ध होतो. त्यानंतर अभ्यास करणे विद्यार्थ्यांना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे स्मार्टफोन उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांना सरकारने टॅब अथवा स्मार्टफोन उपलब्ध देणे आवश्यक आहे.--------------------------कोरोनामुळे प्रत्यक्ष वर्ग भरविणे शक्य नाही. आॅनलाइन शिक्षण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. आॅनलाइनमुळे ६० टक्के विद्यार्थी पुुढे जातील, तर उर्वरित विद्यार्थी मागे राहतील, त्यांना समान कक्षेत आणण्यासाठी शिक्षकांना मोठी कसरत करावी लागले.- एस. बी. देशमुख, सचिव, मुख्याध्यापक संघ--------------------प्रत्यक्ष वर्गातील शिक्षण हे अधिक प्रभावी असते. आॅनलाइन शिक्षण केवळ विद्यार्थ्यांना शाळा बंद असताना व्यस्त ठेवण्याची सोय आहे. शिवाय शिवाय शिक्षण घेण्यात स्मार्टफोन, नेटवर्क, डेटा उपलब्धता आदी तांत्रिक अडचणी आहेत.- विलास पवार, पालक, नाशिक रोड
स्मार्टफोनच नाहीत तर शिकणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 9:17 PM