शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

युतीने तिकीट नाकारल्यास अनेकांची पक्षांतराची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:46 AM

विधानसभा निवडणुकीत भाजपा-सेनेत दावेदारांची वाढती संख्या लक्षात घेऊन उमेदवारी मिळेल किंवा नाही याबाबत अनेक इच्छुकांना धास्ती आहे. तथापि, निवडणूक लढविण्याची तयारी जवळपास पूर्ण झाल्याने उमेदवारी नाकारल्यास अन्य पक्षांकडून उमेदवारी करण्याची तयारी सुरू झाली आहे.

नाशिक : विधानसभा निवडणुकीत भाजपा-सेनेत दावेदारांची वाढती संख्या लक्षात घेऊन उमेदवारी मिळेल किंवा नाही याबाबत अनेक इच्छुकांना धास्ती आहे. तथापि, निवडणूक लढविण्याची तयारी जवळपास पूर्ण झाल्याने उमेदवारी नाकारल्यास अन्य पक्षांकडून उमेदवारी करण्याची तयारी सुरू झाली आहे. विशेषत: भाजपा-सेनेतील अनेक जण कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि मनसेच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. अनेक पक्षांकडेदेखील तुल्यबळ उमेदवार नसल्याने असे पक्षदेखील संबंधिताना चुचकारू लागले आहेत.विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांकडून तयारी सुरू आहे. भाजपा-सेनेत अनेक इच्छुकांनी अगोदर तयारीच नव्हे तर प्रचारालादेखील प्रारंभ केला आहे. हा प्रचारच नव्हे तर स्पर्धा इतकी टोकाला गेली आहे की, एकमेकांच्या विरोधात तक्रारींचे स्वरूपदेखील बघण्यास मिळत आहे. भाजपात शहरातील तीन मतदारसंघांत किमान अर्धा डझन इच्छुक आहेत तर शिवसेनेत पश्चिम मतदारसंघात अनेक दावेदार आहेत. ग्रामीण भागात यापेक्षा वेगळे चित्र नाही. कळवण, चांदवड-देवळा आणि नांदगाव-मनमाड येथे अनेक जण इच्छुक आहेत. शिवसेनेतदेखील इच्छुकांची संख्या वाढतच आहे. त्यातच युतीचा निर्णय होत नसल्याने अनेक जण हवालदिल आहेत. तयारी तर करून ठेवली आहे, परंतु जागा सुटेल किंवा नाही हे सांगता येत नसल्याने अनेक इच्छुक अस्वस्थ आहेत. तयारी झालीच आहे तर निवडणूक लढवायचीच किंवा आता खूप पुढे गेलो आहे, असे सांगून इच्छुक रणांगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे जागा सुटली नाही किंवा उमेदवारीच मिळाली नाही तर अपक्ष म्हणून बंडखोरी करण्यापेक्षा अन्य पक्षाचे लेबल लावलेले अधिक लाभदायी ठरेल, या अपेक्षेने इच्छुकांची तयारी सुरू आहे. युतीतील अनेक जण मनसे तसेच कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेच्या संपर्कात आहेत. मध्य आणि पश्चिम नाशिकमधील भाजपाचा एक इच्छुक राष्टÑवादीच्या संपर्कात आहे, असे सांगण्यात येत आहे. भाजपाचा एक विद्यमान आमदारदेखील पक्षाने उमेदवारी नाकारली आणि युती तुटलीच तर शिवसेना परवडली अशा भूमिकेतून सेनेच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत.मनसेची तर उघड भूमिकाविधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांकडे कुठे ना कुठे उमेदवार नसल्याने त्यांची अडचण होत आहे. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने पंधरा जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा केली असली तरी उमेदवार नसल्याने ऐनवेळी अन्य पक्षांतून येणाऱ्यांचा विचार करू, असे जाहीर केले आहे. त्यामुळे नाशिक पश्चिममधील शिवसेनेच्या एका इच्छुकाने मनसेशी संपर्क वाढवला आहे. युतीत जागा न सुटल्यास मनसेकडून लढवणार असल्याचे या इच्छुकाचे समर्थक सांगत आहेत. अशाच प्रकारे अन्य पक्षातदेखील आपल्याकडील इच्छुकापेक्षा अन्य पक्षातील सबळ उमेदवार असेल तर चालेल, अशीदेखील भूमिका घेत आहेत. त्यामुळे बहुतांशी पक्षांचे युतीचे काय होते आणि त्यानंतर उमेदवारी कोणाला मिळते याकडे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस