येवला विधानसभा मतदारसंघामध्ये छायाचित्र (फोटोसह) मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. गेल्या विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येवला तालुक्यातील २१४ मतदान केंद्र व निफाड तालुक्यातील १०१ मतदान केंद्र असून त्यापैकी २३ मतदान केंद्रांच्या मतदार यादीत ३०५ मतदारांचे छायाचित्र नाही. याबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ) यांच्यामार्फत गृहभेटी (सर्वेक्षण) सुरू आहे. गृहभेटीदरम्यान फोटो नसलेले मतदार गावी राहात नसल्याचे दिसून आले आहे. त्याची नावे कटाक्षाने वगळली जातील, मतदानाचे कर्तव्य व हक्क यापुढेही सहजतेने करता यावे, यासाठी मतदारांनी मतदार यादीत आपले छायाचित्र आहे किंवा नाही यांची खात्री करून तहसील कार्यालयात जाऊन यादी पहावी व ज्याच्या नावापुढे छायाचित्र (फोटो) नाही अशा मतदारांनी ५ मार्चपर्यंत आपल्या फोटोमागे नाव लिहून येवला तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात फोटो जमा करावे असे आवाहन तहसीलदार प्रमोद हिले, निवडणूक नायब तहसीलदार बी. एम. हंडोरे, निवडणूक लिपिक एस. बी. महाजन यांनी केले आहे.
मतदार यादीत फोटो नसल्यास नाव वगळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 4:26 AM