नाशिक : इंदिरानगर तेगोविंदनगरला जोडणाऱ्या बोगद्याची
महापालिका व राष्ट्रीय महामार्गप्राधिकरणाने रुंदी वाढविल्यास बंदबोगदा पूर्ववत सुरू करण्यात येईल,असे आश्वासन पोलीस आयुक्त एस.जगन्नाथन यांनी दिले आहे. सोमवारीइंदिरानगरवासीयांनी बोगद्याच्याविरोधात गोळा केलेल्यानागरिकांच्या स्वाक्षऱ्या तसेचनगरसेवकाकडे नोंदविलेल्या हरकतीपोलीस आयुक्तांना सादर करण्यातआल्या.इंदिरानगरचा बोगदा पूर्ववतसुरू करण्यात यावा, यासाठी हीमोहीम चालविण्यात येत होती. त्यातनागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येतआपला विरोध प्रगट केला.यापूर्वीही पोलीस आयुक्तांची याप्रश्नी भेट घेण्यात आली; परंतुत्याचा काही उपयोग झाला नाही.त्यामुळे नगरसेवक डॉ. दीपालीकुलकर्णी यांनी त्यांच्या संपर्ककार्यालयात नागरिकांना हरकतीनोंदविण्याचे आवाहन केले होते.जवळपास तीनशे हरकती असलेलेपत्र पोलीस आयुक्तांना देण्यातआले. त्यावर हरकतींमधीलसूचनांचा विचार करून निर्णयघेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनीदिले, तर पाचशे नागरिकांच्यास्वाक्षरी असलेले निवेदन दिल्यावरपोलीस आयुक्तांनी इंदिरानगरचारस्ता शंभर फुटी असून त्यामानानेबोगद्याची रुंदी अतिशय कमी आहे.वेळोवेळी वाहतुकीची कोंडी वअपघात होत असल्यानेच राष्ट्रीयमहामार्ग प्राधिकरणाने बोगदा बंदकरण्याची सूचना केली व त्यानुसारतो बंद करण्यात आला. पोलीसआयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळातनगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी,सुनील काण्णव, डॉ. संदीप प्रधान,सचिन कुलकर्णी, शैलेश निकमयांचा तर इंदिरानगरवासीयांच्याशिष्टमंडळात हर्षल गोखले, संतोषकाळे, अमित कोटकर, जमील पटेलयांचा समावेश होता. (प्रतिनिधी)