शहरं
Join us  
Trending Stories
1
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
3
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
4
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
5
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
6
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
7
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
8
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
9
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
10
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
11
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
12
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत
13
रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य
14
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
15
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
16
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
17
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
18
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
19
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
20
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...

सुरेशदादा जैन यांची येवल्यास सदिच्छा भेट

By admin | Published: November 09, 2016 11:46 PM

सुरेशदादा जैन यांची येवल्यास सदिच्छा भेट

येवला : राहता येथून जळगावकडे जाताना माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी येवला शहराला सदिच्छा भेट दिली. येथील विंचूर चौफुलीवरील येवला जैन ओसवाल समाजाच्या वतीने समाजाचे अध्यक्ष विजयकुमार श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते जैन यांचा सत्कार करण्यात आला. सुरेशदादा जैन यांच्या समवेत मुलगी मीनाक्षी जैन होत्या. यावेळी जैन यांनी समाजाची आस्थेने चौकशी करून जैन स्थानकात चालत असलेल्या धार्मिक विधींबाबत माहिती घेतली. याप्रसंगी जैन समाजाचे उपाध्यक्ष सतीश समदडिया, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष राजेश भंडारी, रवींद्र बाफणा, उमेदमल श्रीश्रीमाळ, सुभाष समदडिया, सुरज पटणी, सुरेश बंब, सोहनलाल दुगड, दिनेश बाफणा, महावीर मंडलेचा, हर्षद पारख, सुभाष पारख, सिद्धार्थ पारख, आशिष शिंगी, वीरचंद शिंगी, दर्शन भंडारी, प्रवीण श्रीश्रीमाळ, पारस बाफणा, दिलीप मुथा, मदन चंडालिया आदिंसह जैन बांधव, महिला व युवक उपस्थित होते.