शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
2
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
5
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
6
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
7
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
8
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
9
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
10
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
11
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
12
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
13
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
14
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
15
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
16
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
17
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
18
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
19
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
20
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया

पाणी टॅँकर हवे असेल तर विहीर शोधा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 3:27 PM

नाशिक जिल्ह्यातील पारंपारिक टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये डिसेंबर संपताच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, विशेषत: येवला तालुक्यातील पुर्वभाग व बागलाण तालुक्यातील दुर्गम भागाचा त्यात समावेश आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला असला तरी, काही भागात जेमतेम झालेल्या पावसाने तेव्हढ्यापुरता दिलासा दिला प

ठळक मुद्देअजब फतवा : टंचाईग्रस्त गावांची पाण्यासाठी धावाधावटंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये डिसेंबर संपताच पिण्याच्या पाण्याची टंचाई

नाशिक : पाणी टंचाई भासत असेल तर अगोदर परिसरातील दोन किलो मीटर अंतरावर पाणी असलेल्या विहीरींचा शोध घ्या असा अजब सल्ला जिल्हा प्रशासनाने टंचाईने त्रस्त झालेल्या गावांना दिल्यामुळे प्रशासनाच्या दरबारात खेटा घालून दमलेल्या ग्रामस्थांना पाण्यासाठी विहीरींचा शोध घेण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षी खूप पाऊस झाल्याच्या आनंदात असलेल्या प्रशासनाने ग्रामीण भागातील पाणी टंचाईकडे चालविलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.नाशिक जिल्ह्यातील पारंपारिक टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये डिसेंबर संपताच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, विशेषत: येवला तालुक्यातील पुर्वभाग व बागलाण तालुक्यातील दुर्गम भागाचा त्यात समावेश आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला असला तरी, काही भागात जेमतेम झालेल्या पावसाने तेव्हढ्यापुरता दिलासा दिला परंतु काही ठिकाणी भरपूर पाऊस पडूनही खडकाळ व मुरूमाच्या जमीनीमुळे पाऊस जमिनीत मुरू शकला नाही अशाच भागामध्ये डिसेंबर अखेर पाणी टंचाई भासू लागली आहे. येवला तालुक्यातील भारम, कोळम, कुसूमाडी, खैरगव्हाण, अहेरवाडी आदी गावांच्या विहीरींनी तळ गाठला असून, पावसाळ्यातही या गावांना पुरेसे पर्जन्यमान झालेले नाही त्यामुळे शेतीलाच नव्हे तर पिण्यासाठी देखील ग्रामस्थांना वणवण फिरावे लागत आहे. या ग्रामपंचायतींनी पाण्याच्या टॅँकरसाठी ठराव करून पंचायत समितीला सादर केले, तहसिलदार व गटविकास अधिका-यांनी संयुक्त पाहणी करून पाणी टंचाईची खात्री करून तसे प्रस्ताव जानेवारी महिन्यातच जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केले आहेत. असाच प्रकार बागलाण तालुक्यातील गोराणे, खिरमाने, चौगाव पंचक्रोशीच्या बाबतीत झाला आहे. नद्या, नाले व विहीरी आटल्यामुळे आत्तापासूनच ग्रामस्थांना पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने त्यांनीही टॅँकरची मागणी केली आहे. तथापि, जिल्हाधिकारी कार्यालय अजुनही जिल्ह्यात पडलेल्या १३५ टक्के पावसाच्या आनंदात मग्न असल्याने त्यांना टंचाईग्रस्त गावांची पाण्याची मागणी मान्य नाही. टॅँकर मागणीच्या प्रस्तावांमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी काढून तो परत पाठविण्यातच प्रशासन धन्यता मानत असून, परिणामी पाण्यासाठी टाहो फोडणा-या ग्रामीण जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू झाला आहे. टॅँकर देण्यापुर्वी टंचाईग्रस्त गावापासून दोन किलो मीटर अंतरावर असलेल्या गावांमध्ये पाणी असलेल्या विहीरी शोधण्याचा अजब सल्ला प्रशासनाने दिला आहे त्यामुळे टंचाईग्रस्त गावातील नागरिक व तहसिलदार, गटविकास अधिकारी पाण्याने भरलेल्या विहीरींच्या शोधासाठी धावाधाव करीत आहेत.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक