विंचूर : जागतिक स्तरावरील इंडियन फार्मर फर्टिलायझर को आॅपरेटिव्ह लिमिटेड (इफ्को),नवी दिल्ली या संस्थेच्या पन्नास वर्षांच्या इतिहासात प्रथम महिला संचालक म्हणुन बहुमताने विजयी झाल्याबद्दल विंचूर येथील साधना जाधव यांचा ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी आमदार नितीन भोसले,स्टेट मार्केटींग मॅनेजर नायब,महेंद्र काले,मनोहर देवरे,आत्माराम कुंभार्डे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर,उपसभापती ललित दरेकर,राजाभाऊ डोखळे,राजेंद्र मोगल,बाबासाहेब कोळपे,सुनिल चव्हाण,सोमनाथ चांदगुडे,चंद्रशेखर कुलकर्णी,सरपंच ताराबाई क्षीरसागर,पं.स.सदस्य संजय शेवाळे,संजय होळकर,गुणवंत होळकर,पंढरीनाथ थोरे आदी उपस्थित होते.कार्यक्र माचे प्रास्ताविक डॉ.सुजित गुंजाळ यांनी तर सुत्रसंचालन दिलीप कोथमिरे यांनी केले. परीचय किशोर पाटिल यांनी करुन दिला. इफ्कोच्या संचालकपदाची निवड प्रक्रि या नुकतीच राबविण्यात आली. पन्नास वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या या संस्थेच्या संचालक मंडळात अजूनपर्यंत एकाही महिलेला संधी मिळू शकलेली नव्हती. परंतु, साधना जाधव यांच्या रुपाने पहिल्यांदाच महिला संचालकपदी विराजमान झाली आहे.
इफ्कोच्या प्रथम महिला संचालक जाधव यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 6:29 PM
साधना जाधव यांच्या रुपाने पहिल्यांदाच महिला संचालकपदी विराजमान
ठळक मुद्देइफ्कोच्या संचालकपदाची निवड प्रक्रि या नुकतीच राबविण्यात आली