घोटी : इगतपुरी तालुक्यात काँग्रेस पक्षात तालुकाध्यक्ष निवडीवरून वादंग निर्माण होऊन गटबाजी उघडकीस आली. प्रदेश पातळीपर्यंत हा वाद गेल्याने प्रदेश काँग्रेसनेही त्याची दखल घेत परिस्थिती ह्यजैसे थेह्ण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (दि.२७) मुंबईला गेलेल्या शिष्टमंडळाची बाजू समजावून घेत प्रदेश काँग्रेसने चार दिवसांपूर्वी रमेश जाधव यांची तालुकाध्यक्षपदी केलेल्या नियुक्तीला स्थगिती दिली. यानिमित्ताने काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली आहे.इगतपुरी तालुक्यात काँग्रेसमध्ये गटबाजीने चांगलेच डोके वर काढले आहे. त्याचा प्रत्यय येत असून, गेल्या चार दिवसांपासून तालुका काँग्रेस अध्यक्ष निवडीवरून सुरू असलेला वाद अखेर चव्हाट्यावर आला. चार दिवसांपूर्वीच तालुकाध्यक्ष म्हणून रमेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीवरून तालुक्यात काँग्रेसच्याच दुसऱ्या गटाने आक्रमकपणे हरकत घेऊन ही नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता. अखेर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मुंबई येथे धाव घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर आमदार हिरामण खोसकर यांच्या समक्ष बाजू मांडली.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुंबईत भेटलेल्या शिष्टमंडळात ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जि. प. सदस्य जनार्दन माळी, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष संपत सकाळे, प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ, लकी जाधव यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब कुकडे, उत्तमराव भोसले, बाळासाहेब वालझाडे, बाळासाहेब लंगडे, ईश्वर सहाणे, ज्ञानेश्वर खातळे, निवृत्ती कातोरे, पोपटराव मालुंजकर, ज्ञानेश्वर कडू, योगेश सुरुडे, इगतपुरी शहराध्यक्ष संतोष सोनवणे आदींसह नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अध्यक्षपदी धांडे कायमप्रदेश कार्यालयाने या बाजूचीही दखल घेत चार दिवसांपूर्वी रमेश जाधव यांच्या तालुकाध्यक्ष नियुक्तीला स्थगिती देऊन वाद शमविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इगतपुरी तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी रामदास धांडे हेच असतील यावर प्रदेश काँग्रेसने शिक्कामोर्तब केले. आगामी काळात तालुका अध्यक्ष बदल करायचा ठरल्यास तालुक्यातील कॉंग्रेसजनांची मते जाणून घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असेही पटोले यांनी नमूद केल्याचे सांगण्यात आले.
आमच्या तीन पिढ्यांपासून आम्ही काँग्रेस पक्षात असून, पक्ष मजबुतीसाठी मी स्वतः ४० वर्षांपासून पक्षाचे काम करत आहे. तालुक्यात काँग्रेसच्या गटबाजीमुळे तालुक्यात आठ दिवसांपासून नवीन अध्यक्ष नियुक्त करून गोंधळ उडाला होता; पण प्रत्यक्षात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माझ्या आत्तापर्यंत केलेल्या पक्षाच्या कामाचा विचार करत पत्र देत तालुकाध्यक्षपद कायम ठेवले आहे.- रामदास धांडे, तालुकाध्यक्ष, इगतपुरीमहाराष्ट्र राज्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत माझी इगतपुरी तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली होती; परंतु तूर्तास या निवडीला स्थगिती दिली असून, काही दिवसातच वरिष्ठांकडून निर्णय होईल.- रमेश जाधव, माजी सरपंच, गोंदे दुमाला