नाशिक : नाशिक विकास पॅकेज अंतर्गत इगतपुरी येथे मंजूर असलेली आदिवासी विकास विभागाची क्रीडा प्रबोधिनी आदिवासी विकास मंत्र्यांच्या जिल्ह्यात कांबळगाव, ता. पालघर येथे पळविण्याचा घाट सरकारने घातला असल्याचा आरोप करीत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधानभवनच्या पाय-यांवर राष्टÑवादीचे आमदार जयंत जाधव व नरहरी झिरवाळ यांनी निदर्शने केली.इगतपुरी येथील क्रीडा प्रबोधिनीचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आमदार जाधव यांनी सन २०१७ च्या पावसाळी अधिवेशनात नियम ९३ अन्वये सूचना दाखल केली होती. त्यावर आदिवासी मंत्र्यांनी जाधव यांना निवेदन पाठविले असता त्यात ही बाब उघडकीस आली. २४ आॅगस्ट २००९ रोजी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता इगतपुरी येथे क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्याचा शासन निर्णय झाला होता. जून २०१७ पर्यंत प्रबोधिनीचे काम सुरू झाले नाही, असे त्या सूचनेत आमदार जाधव यांनी म्हटले होते. त्यावर आदिवासी मंत्र्यांनी लेखी निवेदन दिले त्यात म्हटले होते की, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी खान्देश पॅकेज अंतर्गत इगतपुरी येथे क्रीडा प्रबोधिनी व नंदुरबार येथे मध्यवर्ती क्रीडा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु इगतपुरी येथे क्रीडा प्रबोधिनीसाठी जागा प्राप्त झालेली नाही. प्रत्यक्ष बांधकामाकरिता अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली नसल्यामुळे पालघर येथे उपलब्ध असणारी दळणवळणाची साधने व तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षकांची उपलब्धता विचारात घेऊन सदरची क्रीडा प्रबोधिनी पालघर तालुक्यातील कांबळगाव येथे करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. प्रत्यक्षात क्रीडा प्रबोधिनीसाठी जागा व अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली असतानाही निव्वळ आदिवासी मंत्र्यांचे गाव आहे म्हणून ती पळवून नेली जात असल्याचा आरोप करून आमदार जयंत जाधव व नरहरी झिरवाळ यांनी विधानभवनच्या पायºयांवर बसून सरकारच्या विरोधात फलक झळकवून निदर्शने केली.
इगतपुरीची क्रीडा प्रबोधिनी पालघरला पळविण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 7:32 PM
इगतपुरी येथील क्रीडा प्रबोधिनीचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आमदार जाधव यांनी सन २०१७ च्या पावसाळी अधिवेशनात नियम ९३ अन्वये सूचना दाखल केली होती.
ठळक मुद्दे आरोप : विधिमंडळ पाय-यांवर राष्टÑवादीच्या आमदारांची निदर्शने२४ आॅगस्ट २००९ रोजी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता इगतपुरी येथे क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्याचा शासन