घोटी : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी खेड गणाच्या सदस्य जया रंगनाथ कचरे यांची बिनविरोध वर्णी लागली आहे तर उपसभापतीपदी वाडीव-हे गणाच्या सदस्या जिजाबाई राजाराम नाठे यांची निवड झाली. दहा सदस्यांपैकी सात सदस्य एकट्या शिवसेनेचे असून पंचायत समितीवर शिवसेनेची अबाधित सत्ता आहे. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस ह्या पक्षांचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अर्चना पागिरे यांनी केल्यानंतर समर्थकांनी जल्लोष केला. इगतपुरी पंचायत समितीमध्ये ह्या निवडणुकीनिमित्ताने सर्वांनी आघाडी करून खेळीमेळीचे वातावरण निर्माण केले.पंचायत समितीच्या सभापती पदासाठी इगतपुरी येथे निवडणूक प्रक्रि या घेण्यात आली. सभापती पद अनुसूचित जमाती साठी आरिक्षत असल्याने शिवसेनेच्या खेड गणाच्या सदस्या जया रंगनाथ कचरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. उपसभापती पदावर शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजाराम नाठे यांच्या सौभाग्यवती तथा वाडीवºहे गणाच्या सदस्य जिजाबाई राजाराम नाठे यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेना नेत्या माजी आमदार निर्मला गावित, राजाभाऊ वाजे, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी तालुकाप्रमुख राजाराम नाठे यांनी पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेना नेते कुलदीप चौधरी, कचरू पाटील डुकरे, हरिभाऊ वाजे, मोहन बर्हे, समाधान वारु ंगसे, साहेबराव झनकर, शिवाजी काळे, गणेश टोचे, रघुनाथ तोकडे, रमेश धांडे, अनिल भोपे, कैलास कडू, संदीप जाधव, संदीप खराटे, नामदेव साबळे, भाऊसाहेब वाजे, सुदाम भोसले, भास्कर वाजे, रमेश गव्हाणे आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी मावळत्या सभापती कल्पना हिंदोळे, मावळते उपसभापती भगवान आडोळे, गटनेते विठ्ठल लंगडे, पंचायत समतिी सदस्य विमल तोकडे, विमल गाढवे, सोमनाथ जोशी, कौसाबाई करवंदे, मच्छिंद्र पवार उपस्थित होते.
इगतपुरी : सभापतिपदी जया कचरे तर उपसभापतीपदी जिजाबाई नाठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 2:41 PM