इगतपुरी : पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९६व्या जयंतीनिमित्त तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोमवारी (दि. ३१) शहरातील खालची पेठ, टीकापुरी येथील जामा मशिदीजवळ नगरसेवक दिनेश कोळेकर व सहकारी यांनी औषधी रोपांचे रोपण केले.शहराच्या सौंदर्यात भर पडावी, शहराचे आरोग्य चांगले राहावे, लोकांना शुध्द हवा मिळावी, या हेतूने परिसरात सुमारे पन्नासपेक्षा अधिक वृक्षांचे रोपण करून त्यांच्या संगोपनाचे काम स्थानिक युवकांवर सोपविण्यात आले आहेत. तत्पूर्वी इगतपुरी नगर परिषद कार्यालयात राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सुधीर भिडे, तौफिक शेख, आरिफ शेख, सुधीर कांबळे, रवी टोणपे, किशोर मुळे, अरुण म्हसणे, जामा मशिदीचे अध्यक्ष अजीम शेख तसेच रहिवासी उपस्थित होते.
औषधी रोपटयांचे इगतपुरीत रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 7:43 PM
इगतपुरी : पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९६व्या जयंतीनिमित्त तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोमवारी (दि. ३१) शहरातील खालची पेठ, टीकापुरी येथील जामा मशिदीजवळ नगरसेवक दिनेश कोळेकर व सहकारी यांनी औषधी रोपांचे रोपण केले.
ठळक मुद्देपरिसरात सुमारे पन्नासपेक्षा अधिक वृक्षांचे रोपण