शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

इगतपुरीत पावसाचा दणका; भातपिकावर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 00:29 IST

भाताचे कोठार आणि पावसाचे माहेरघर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात भातपिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. यंदा पावसाने सुरुवातीला चांगली हजेरी लावल्याने पीकही बहरले आहे; मात्र तीन दिवसांपासून संततधार पावसाने या पिकाला दणका दिला आहे.

वैतरणानगर : भाताचे कोठार आणि पावसाचे माहेरघर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात भातपिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. यंदा पावसाने सुरुवातीला चांगली हजेरी लावल्याने पीकही बहरले आहे; मात्र तीन दिवसांपासून संततधार पावसाने या पिकाला दणका दिला आहे. भातपिकाला धोका निर्माण झाला असून, करपा आणि कडा करपा या रोगांनी पिकावर आक्रमण केल्याने पिकावर संक्रांत आली आहे. यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.ढगाळ वातावरणामुळे दोन्ही रोगांचा प्रभाव प्रामुख्याने पीकवाढीच्या सर्वच अवस्थेवर परिणाम झाल्याने तसेच ऐन बहरात आलेले भातपीक करपा व विविध रोग सदृश परिस्थितीमुळे भातपिकाच्या उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे आधीच नुकसान सोसल्याने व परतीच्या पावसामुळे रब्बी हंगाम लांबत जाणार असल्यामुळे बळीराजा धास्तावला आहे. इगतपुरी तालुक्यात सलग तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. पिकांचे नुकसान झाले असून, याकडे तालुका कृषी विभागाचा काणाडोळा होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तत्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.भात लागवडीसाठी लाखो रुपयांची कर्जे घेऊन हातातोंडाशी आलेला घासही निसर्गाच्या अवकृपेमुळे निघून जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी ऐन सणासुदीत चिंता व्यक्त करीत आहे.द्राक्ष उत्पादक चिंतितपांडाणे : दिंडोरी तालुक्यातील चौसाळा, करंजखेड, सारसाळे, खोरीपाडा, माळे दुमाला परिसरात बुधवारी सायंकाळी ५ वाजता पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे द्राक्षबागायतदार व भात उत्पादकांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे.दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील भात, नागली, वरी, उडीद, मूग पिकाचे नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे बळीराजा चिंतित आहे. भुईमूग व भात पीक उतरून पडणार की काय अशी स्थिती निर्माण झाली असून, नुकसान झालेल्या पिकांचा त्वरित पंचनामा करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती