गेल्या चोवीस तासांत विक्रमी अशी २२२ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे रविवारी पावसाने सायंकाळपासून चांगलाच जोर धरला व दमदार हजेरी लावून धरणाच्या साठ्यात वाढ केली आहे.
इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम व खेड्याच्या भागात पावसाने सर्वत्र जोरदार मुसंडी मारली असून घाटमाथ्यावरील इगतपुरी, भावली, मानवेढे, काळुस्ते, वैतरणा पट्ट्यात जोराचा पाऊस असल्याने या परिसरातील शेतातला काही भाग जलमय झाला आहे. भातशेतीला हा पाऊस पूरक असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील भाजी विक्रेते व लहान लहान व्यापाऱ्यांचे चांगलेच हाल झाले. इगतपुरी तालुक्यात एकूण ११२३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.