शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

इगतपुरी, सिन्नरला घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 12:01 AM

इगतपुरी : शहरातील ख्रिश्चन कॉलनी येथे तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास घराच्या लोखंडी दरवाजाची जाळी कापून प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले सुमारे अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देलाखोेंचा ऐवज लंपास : सततच्या चोऱ्यांमुळे नागरिक भयभीत

इगतपुरी : शहरातील ख्रिश्चन कॉलनी येथे तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास घराच्या लोखंडी दरवाजाची जाळी कापून प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले सुमारे अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, चोºयांच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांसमोर आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान असून, अद्याप एकही आरोपी पकडण्यास पोलिसांना यश आले नसल्याने शहरात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.शहरातील कॉन्व्हेंट हायस्कूलजवळील रहदारीच्या वस्तीत असलेल्या ख्रिश्चन कॉलनीते राहणारे फिलीप जॉन दास यांच्या घरात शनिवारी रात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी लोखंडी दरवाजाची जाळी कापून प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले ५० हजार किंमतीची २५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, २० हजार किमतीची १० ग्रॅमची सोन्याची अंगठी, १६ हजार किमतीची अंगठी, १० हजार किमतीची सोन्याची अंगठी, २० हजारांचे सोन्याचे नेकलेस, १० हजार किमतीचे सोन्याचे कानतले, ६ हजार किमतीचे सोन्याचे पेंडल, २० हजार किमतीचे सोन्याची साखळी, १० हजार किमतीचे सोन्याच्या ५ बाळअंगठ्या, ३ हजार किमतीये चांदीचे तीन जोड पैंजण, दीड हजाराचा चांदीचा कमरबंद, ३० हजारांचे मंगळसूत्र, ६ हजारांचे ओमपान, ३४ हजारांची सोन्याची साखळी व १५ हजार रु पये रोख असा एकूण २ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.चोरीची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, सहायक पोलीस निरिक्षक महेश मांडवे यांनी धाव घेत पंचनामा केला. संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे समजते. ज्या घरात चोरी झाली त्या घरी काही दिवसांनी लग्न असल्याचे समजते.या जबरी चोरीमुळे शहरात खळबळ उडाली असून, मागील काही महिन्यात शहर भागात चार-पाच घरफोड्या झाल्या आहेत. मात्र त्यातील एकाही चोरीचा छडा लावण्यास पोलिसांना यश आलेले नाही. या जबरी चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.दागिने लांबविलेसिन्नर : शहरातील शिवाजीनगर परिसरातील नाईक मळा भागात असलेल्या ऋ तुरंग पार्कमधील बंद फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्याने घरफोडी करत सुमारे ९ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ४ हजार रु पये रोख असा ऐवज लांबविल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. नांदूरशिंगोटे येथील शरदचंद्र घुले हे ऋ तुरंग पार्कमध्ये कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. शनिवारी (दि.४) घुले कुटुंबीय गावी गेलेले असल्याने त्यांच्या फ्लॅटला कुलूप होते. सिन्नर पोलिसांनी केला पंचनामा शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी घुले यांच्या फ्लॅटच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील लाकडी कपाट आणि इतर ठिकाणी उचकापाचक करून कपाटात ठेवलेले साडेचार तोळे वजनाची सोन्याची पोत, ५ तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस व ४ हजार रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. पहाटे ३.४५ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर घुले यांना माहिती देण्यात आली.घुले यांनी तत्काळ सिन्नर येथे धाव घेऊन पाहणी केली असता चोरी झाल्याचे लक्षात आले. घुले यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात चोरीची झाल्याची माहिती दिली.सहायक पोलीस निरीक्षक आर. बी. लोखंडे यांच्यासह कर्मचाºयांनी तातडीने धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.