घोटी : पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्याला मुसळधार पावसाने पुन्हा एकदा चांगलेच झोडपून काढले असून,गेली आठवड्याभरापासून पावसाने थोडीही उसंत न घेतल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.दरम्यान मुसळधार पावसामुळे तालुक्यातील धरणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून अनेक धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. तालुक्यात गेली काही दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.तालुक्यातील वैतरणा,वाडीव-हे,टाकेद नांदगाव सदो परिसरसह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची संततधार चालूच असल्याने या पावसामुळे तालुक्यातील सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.तालुक्यातील सर्वच धबधबे मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाले असल्याने पर्यटकांची तालुक्यात रीघ लागली आहे. दरम्यान या मुसळधार पावसामुळे घोटी इगतपुरी शहरातील मुख्य रस्ते जलमय झाले असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.तालुक्यातील धरणसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली असून भावली,भाम,दारणा,वैतरणा या धरणापाठोपाठ पूर्व भागातील कडवा धरणही पूर्ण क्षमतेने भरल्याने पूर्व भागातील तसेच सिन्नर भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
इगतपुरी तालुक्याला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 1:39 PM
घोटी : पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्याला मुसळधार पावसाने पुन्हा एकदा चांगलेच झोडपून काढले असून,गेली आठवड्याभरापासून पावसाने थोडीही उसंत न घेतल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.दरम्यान मुसळधार पावसामुळे तालुक्यातील धरणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून अनेक धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. तालुक्यात गेली काही दिवसांपासून मुसळधार पावसाने ...
ठळक मुद्देधरणसाठ्यात वाढ : सरासरीच्या तुलनेत ८३ टक्के पाऊस, कडवा ओव्हरफ्लो