जिल्ह्यात कडक लॉकडाऊनच्या माध्यमातून कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न शासन व प्रशासन करत असताना त्याचे चांगले परिणामही दिसून येत आहे. घोटीसारख्या बाजारपेठेच्या शहरात लोकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत असले तरी विनाकारक हिंडणारे, काही टवाळखोर युवकही दुचाकीवर हिंडताना आढळत असल्याने घोटी पोलिसांनी आता त्याकडे लक्ष केंद्रित केले असून विनाकारण हिंडणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई सुरू असून आजही सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने चौकाचौकात कारवाईची मोहीम राबवून विनाकारण हिंडणाऱ्यांना रोखले जात होते. जलद गतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज असून शासन नियमांचे पालन करून कडक संचारबंदीचेही पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले.
(१४ घोटी)
===Photopath===
140521\14nsk_28_14052021_13.jpg
===Caption===
१४ घोटी