शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

इगतपुरी तालुक्यात दुपारनंतर वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 1:13 AM

तालुक्यातील मतदान केंद्रांवर सकाळी ११ वाजेपर्यंत मतदानाला अल्प प्रतिसाद मिळाला, मात्र दुपारनंतर वेग आल्याने पाच वाजेपर्यंत ५७ टक्के मतदानाची नोंद झालेली होती. तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान होत असताना वाडीवºहेतील एका मतदाराने विशिष्ट उमेदवाराला मतदान करतानाचे छायाचित्र फेसबुकवर टाकल्याने गोपनीयतेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इगतपुरी : तालुक्यातील मतदान केंद्रांवर सकाळी ११ वाजेपर्यंत मतदानाला अल्प प्रतिसाद मिळाला, मात्र दुपारनंतर वेग आल्याने पाच वाजेपर्यंत ५७ टक्के मतदानाची नोंद झालेली होती. तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान होत असताना वाडीवºहेतील एका मतदाराने विशिष्ट उमेदवाराला मतदान करतानाचे छायाचित्र फेसबुकवर टाकल्याने गोपनीयतेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इगतपुरी तालुक्यात १५६ मतदान केंद्र असून सोमवारी सकाळी सात वाजता प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी ११ वाजेपर्यंत फक्त १४.५० टक्के मतदान झाले होते. मात्र दुपारपासून मतदान केंद्रावर गर्दी दिसू लागली होती. तालुक्यातील दोन मतदान केंद्रावरील यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने तातडीने यंत्र बदलून मतदान सुरू करण्यात आले. दिव्यांग आणि वृद्ध मतदारांना मतदान करता यावे म्हणून प्रत्येक केंद्रावर विशेष व्यवस्था करण्यात आलेली होती.छायाचित्र काढून फेसबुकवर पोस्टमतदान केंद्रात मोबाइल नेण्यास बंदी असताना वाडीवºहे येथील मतदान केंद्रात नितीन कचरू कातोरे हे मोबाइल घेऊन गेले. त्यांनी स्वत:चे मत नोंदवत असतांना छायाचित्र काढून ते फेसबुकवर पोस्ट केले. निवडणूक यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बाब गोपनीयतेचा भंग असल्याचे सांगून मतदान केंद्र अध्यक्षांना संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची सूचना केली. त्यानुसार वाडीवºहे पोलीसात संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक