इगतपुरी/त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणुकीमध्ये अनुक्रमे शिवसेना आणि भाजपाने सत्ता राखत नगराध्यक्षपदही काबीज केले आहे. सोमवारी झालेल्या मतमोजणीमध्ये या दोन्ही ठिकाणी एकतर्फी निकाल लागलेले दिसून आले.इगतपुरी नगरपालिकेत शिवसेना-रिपाइंने २५ वर्षांपासूनची सत्ता अबाधित राखली. नगरसेवकांच्या १८ पैकी १३ जागा जिंकत शिवसेनेने नगराध्यक्षपदही जिंकले. स्वतंत्रपणे लढणाºया भाजपाने चार जागा जिंकून दुसरे स्थान मिळवले. या पक्षाला या चारही जागांचा लाभ झाला आहे. शिवसेनेला टक्कर देणाºया बहुजन विकास आघाडीला इगतपुरीकरांनी साफ नाकारले. इंदिरा काँग्रेस, भारिप या पक्षांना खातेही उघडता आले नाही. शिवसेनेने तिकीट नाकारलेल्या एका अपक्षानेही निवडणुकीत बाजी मारली आहे. नगराध्यक्षपदावर शिवसेनेचे संजय इंदुलकर विजयी झाले. त्यांनी भाजपाच्या फिरोज पठाण यांचा ८६९ मतांनी पराभव केला. त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणुकीत भाजपाने सत्ता कायम राखत नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या १४ जागा पटकावल्या आहेत, यापैकी एक जागा बिनविरोध आली आहे. शिवसेनेला केवल २ जागांवर समाधान मानावे लागले. येथेही कॉंग्रेस,राष्टÑवादीला भोपळाही फोडता आला नाही. येथे १ अपक्ष उमेदवारही विजयी झाला आहे.नगराध्यक्षपदी भाजपाचे पुरु षोत्तम लोहगावकर विजयी झाले.त्यांनी अपक्ष बाळू झोले यांचा १२८७ मतांनी पराभव केला.कॉँग्रेसचा उमेदवार तिसºया स्थानावर राहिला.
इगतपुरी नगरपालिकापक्षीय बलाबलएकूण जागा - १८शिवसेना - १३भाजपा - ४अपक्ष - १.
त्र्यंबक नगरपालिकापक्षीय बलाबलएकूण जागा - १७भाजपा - १४शिवसेना - २अपक्ष - १.