नाशिक : औरंगाबादमध्ये फटाके विक्री दुकानांना लागलेल्या आगीचे पडसाद शनिवारी (दि़२९) नाशिक शहरातही उमटले़ या दुर्घटनेमुळे जागे झालेले महापालिका व पोलीस प्रशासनाने दुकानांच्या नियमावलीची चोख अंमलबजावणी झाली की नाही याची पाहणी केली़ त्यातील गोल्फ क्लब (ईदगाह मैदान) व डोंगरे वसतिगृह मैदानावरील गाळ्यांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी गाळ्यांमधील नियमानुसार अंतर नसल्याने मनपा व पोलीस यंत्रणेने अल्टिमेटम दिला आहे़ मात्र, विक्रेत्यांवरील कारवाईबाबत या दोन्ही यंत्रणा एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करीत असल्याचे चित्र आहे़डोंगरे वसतिगृह मैदानावरील खासगी फटाके विके्रत्यांकडे मनपा अग्निशमन विभागाची परवानगी नसल्याने शुक्रवारी कारवाई करण्यात आली होती़ मात्र, शनिवारी त्यांना परवानगी देण्यात आल्याने कारवाई करण्यात आलेली नाही़ तसेच दोन दुकानांमधील अंतराबाबतच्या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका व पोलीस संयुक्तपणे कारवाई करतील़- डॉ़ रवींद्रकुमार सिंघल,पोलीस आयुक्त, नाशिक़
सुरक्षिततेकडे दुर्लक्षच, यंत्रणांना आता आली जाग
By admin | Published: October 30, 2016 1:32 AM