पोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांना निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष बबलू मिर्झा. समवेत पंकज सूर्यवंशी, ललित पवार.
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दिव्यांग अधिकार कायद्यानुसार दिव्यांगांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात येणाºया दिव्यांगांच्या तक्रारीची योग्य दखल घेऊन त्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी दिव्यांग कल्याण संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्तांकडे करण्यात आलेली आहे. या संदर्भात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींना पोलीस ठाण्यात प्राधान्य देण्यात येणे अपेक्षित आहे. दिव्यांग अधिकार कायद्यानुसार पिडीत दिव्यांगांच्या हक्काचे संरक्षण व्हावे यासाठी त्यांच्या तक्रारीची दखल घ्यावी. निवेदनावर दिव्यांग कल्याण संघटनेचे अध्यक्ष बबलू मिर्झा, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे शहराध्यक्ष ललित पवार, जिल्हा सचिव पंकज सूर्यवंशी आदी उपस्थित होते. दिव्यांग अधिकार कायद्याची निवेदनात आठवणदिव्यांग अधिकार कायद्यानुसार दिव्यांगांना अपमानास्पद वागणूक, शिवीगाळ, मारहाण, दमदाटी केल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आलेली आहे. सर्व पोलीस ठाण्यांना या संदर्भातील आदेश देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.