नाशिकरोड : कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाची शासनाने दखल घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. नाशिक कोळी महासंघाच्या वतीने विभागीय उपायुक्त दिलीप कोळी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी टोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव, मल्हार कोळी, डोंगर कोळी यांना आदिवासी जमातीचे दाखले मिळावे, आदिवासींच्या सातबारावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायद्याप्रमाणे जमिनीचे संरक्षण व्हावे याकरिता आदिवासी जमीनधारकांना आदिवासी म्हणून दप्तरी नोंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनांवर महासंघाचे जिल्हा अध्यक्ष गुलाब गांगोडे, शहराध्यक्ष युवराज सौंदाणे, गणेश राजकोर, किसन सोनवणे, अशोक जाधव, राजेंद्र ताजणे, अंजली अभंगराव, महेंद्र सौंदाणे, डॉ. महेंद्र चित्ते, अशोक बुरंगे, ज्ञानेश्वर सोनवणे, दिलीप सोनवणे, आश्वनी घाणे, अनिल कुमावत, शिवाजी सूर्यवंशी, प्रकाश शिगणारे, आदींच्या सह्या आहेत. बिगर आदिवासींनी आदिवासींच्या हस्तांतरित केलेल्या जमिनी पुन्हा आदिवासींना मिळवून द्या आदी मागण्यांसाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोळी समाजाचे युवक उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाची शासनाने त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
कोळी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 1:05 AM