शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
"१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
5
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
6
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
7
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
8
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
9
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
10
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
11
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
12
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
13
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
14
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
15
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
16
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
17
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
18
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
19
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
20
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

झोडगेत दारूबंदीच्या मागणीकडे दुर्लक्ष

By admin | Published: January 14, 2016 10:09 PM

महिलावर्गात तीव्र संताप; निवेदनांना केराची टोपली

झोडगे : झोडगेतील महिला गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार दारूबंदीची मागणी करीत असून, संबंधित वरिष्ठ अधिकारी त्याकडे ‘सर्रास’ डोळेझाक करीत असल्याने झोडगेत दारूबंदी होणार की नाही, याबाबत महिलावर्ग साशंक आहे.येथे दारूबंदीची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. सर्व संबंधितांना अनेक वेळा निवेदने दिली. याबाबत नंतर काय कार्यवाही होते हे जरी गुलदस्त्यात राहत असले, तरी दारूच्या दुष्परिणामांची जाणीव असणाऱ्या महिला भगिनींकडून मात्र गावात दारूबंदीचा आवाज उठवला जातो, त्याला सर्वांचा उत्स्फूर्त पाठिंबाही मिळतो; मात्र प्रशासन व ग्रामस्थ याचा सोयीस्कर वापर करून घेत असल्याने झोडगेत दारूबंदी म्हणजे सध्या ‘मृगजळ’च ठरत असल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्यात दुष्काळ पाहणी दौऱ्यानिमित्त झोडगेत आलेले भिवंडीचे आमदार शांताराम मोरे यांनाही पुन्हा एकदा दारूबंदीचे निवेदन सरपंच मालती नेरकर व ग्रामपंचायतच्या महिला सदस्यांच्या हस्ते देण्यात आले व दारूबंदीची मागणी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य वैशाली देसाई यांनी अगदी लहान मुलेही दारूचे व्यसन करत असल्याचे नमूद केले. पूर्वाश्रमीचे बंद पडलेले देशी दारूचे दुकान पुन्हा सक्रिय होऊन पिणाऱ्यांना सरकारी दरातील व विना भेसळीची दारू मिळू लागली. गेल्या अनेक दिवसांपासून भेसळीची व निकृष्ट दर्जाची दारू चढ्या भावाने त्यांना घ्यावी लागत होती. वाऱ्याची दिशा बघून धंदा बंद/चालू करण्यात वाकबगार असणाऱ्यांना प्रशासनाचे भय कधी वाटलेच नाही. तीच परिस्थिती महामार्गावरची. भाव जास्त द्यावा लागेल पण सहज उपलब्ध होईल अशा पद्धतीने सर्रास अनधिकृतपणे दारू विक्री सुरू आहे ती कोणाच्या आशीर्वादाने, असा प्रश्न विचारला जात आहे.