लखमापूर : महाराष्ट्रातील पश्चिमकडे गुजरातला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविणा-या आण िमंञी छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या देवसाने (मांजरपाडा) प्रकल्पाच्याबोगद्याचे काम पुर्ण होऊन ही या प्रकल्पाचा जिल्ह्यातील व तालुक्यातील नागरिकांना विसर पडला की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.या प्रकल्पाचे पाणी वाहून पुणेगाव धरणात येऊ लागताचं या पाण्याचे जलपूजन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ,आमदार नरहरी झरिवाळ, आमदार पंकज भुजबळ इ. यांच्या हस्ते 25 जुलै 2019 रोजी झाले होते. यावेळी तालुक्यातील व जिल्हा भरातून अनेक मान्यवरांनी हा ऐतिहासिक प्रकल्प पाहाण्यासाठी हजेरी लावली होती. वर्षानुवर्षे दुष्काळाची झळ खाणारा चांदवड, येवल्यासह,दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाला सिंचनासाठी या प्रकल्पामुळे एक प्रकारे जलसंजीवनी मिळणार आहे.पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडवून ते वळण योजनांव्दारे पुर्व वाहिनी गोदावरी खो-यामध्ये वळविण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळांच्या प्रयत्नांमुळे जलसंपदा विभागाने दि. 24 नोव्हेंबर 2006 ला मांजरपाडा प्रकल्प या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिली. पश्चिम वाहिनी-पुर्व वाहिनी खोरे दुभाजक रेषेच्या पश्चिम बाजुला वाहत जाणारे छोटे छोटे नाले तीव्र उतार सुरू होण्याआधी छोटे बंधारे बांधून अडविणे. त्यांचा सांडवा पुर्व बाजुला काढून सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी कालव्याद्वारे पुर्व बाजुला गोदावरी खो-यात वळविणे असे या प्रकल्पांचे स्वरु प आहे.प्रकल्पाच्या ठळक बाबीमांजरपाडा धरणाची एकूण लांबी - 3 हजार 450 मीटर.समुद्र सपाटीपासुन धरणमाथा पातळी - 722 मीटर.पुर्ण संचय पातळी - 718 मीटर.अडलेले नाले - 12.जोड आण िवळण बोगदा लांबी - 10.16 कि. मीटर.उनंदा नदीत हस्ते गावाजवळ पाणी सोडण्यासाठी चर - 3.20 मीटर.वळण योजनेसाठी संपादित जमीन - 64.24 हेक्टर वन आण ि30.18 हेक्टर खाजगी.योजनेची किंमत - 328 कोटी 45 लाखपुणेगाव धरणाव्दारे पाणी वितरित होणारे तालुके - दिंडोरी, चांदवड, येवला.आगामी काळात पार गोदावरी नदीजोड प्रकल्पाव्दारे वळविले जाणारे पाणी सुध्दा याच बोगद्याद्वारे पोचणार गोदावरी खो-यात.13 वर्षा नंतर या बोगद्याचे अथक परिश्रमांतून काम पुर्ण झाले. एवढी मेहनतीतुन साकारलेला हा मांजरपाडा प्रकल्प भर पावसाळ्यातही नागरिकांच्या नजरेतून व चर्चेतुन दुर यांची खंत वाटत आहे.
प्रकल्प जनतेच्या चर्चेतून दुर्लक्षति
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 4:57 PM
लखमापूर : महाराष्ट्रातील पश्चिमकडे गुजरातला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविणा-या आण िमंञी छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या देवसाने (मांजरपाडा) प्रकल्पाच्याबोगद्याचे काम पुर्ण होऊन ही या प्रकल्पाचा जिल्ह्यातील व तालुक्यातील नागरिकांना विसर पडला की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ठळक मुद्देदिंडोरी तालुक्याचे वैभव मांजरपाडा प्रकल्पाचा भर पावसाळ्यात जनतेला विसर