नाशिक : महापालिकेने आता बेकायदा फलकबाजांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. स्वच्छ सर्वेक्षणाची मोहीम सुरू असताना फलकबाजांवरदेखील कारवाईचा धडका सुरू करण्यात आला असून, ३१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.लोकसभा आणि त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता कालावधीमुळे शहर फलकमुक्त झाले होते. त्यानंतर मात्र पुन्हा फलक लागण्यास प्रारंभ झाला आहे. आमदार आणि मंत्र्यांची निवड झाल्यानंतर अभिनंदनाचे फलक लागण्यास सुरुवात झाली आणि आता तर वाढदिवस शुभेच्छांपासून दशक्रिया विधीपर्यंत फलक लागण्यास प्रारंभ झाला आहे. सध्या केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ शहर सर्वेक्षण सुरू असून कोणत्याही क्षणी केंद्र शासनाचे पथक नाशिकमध्ये दाखल होऊ शकते. त्यामुळे स्वच्छतेबाबत दक्षता घेणे सुरू असतानाच शहराच्या विविध भागात फलकबाजांचे पेव फुटले आहे. शहरातील गल्लीबोळात आणि चौकाबरोबरच वाहतूक बेटांवरदेखील फलक लावण्यात येत असल्याने फलकबाजांना आवरण्यासाठी महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. आत्तापर्यंत ३१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, सर्वाधिक दहा गुन्हे सिडको भागात दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे फलकबाजांचे धाबे दणाणले आहे.कारवाई सुरूच रहावी...महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेली फलकबाजांवरील कारवाई यापुढेही सुरूच ठेवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. केवळ निवडणूक काळातच शहर फलकमुक्त असते मात्र एरवी पुन्हा फलक झळकू लागत असल्याने शहराच्या बकालपणात भर पडते. त्यामुळे ही कारवाई नियमितपणे सुरूच ठेवावी, अशी मागणी होत आहे.
बेकायदा फलकबाज महापालिकेच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 1:48 AM
महापालिकेने आता बेकायदा फलकबाजांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. स्वच्छ सर्वेक्षणाची मोहीम सुरू असताना फलकबाजांवरदेखील कारवाईचा धडका सुरू करण्यात आला असून, ३१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ठळक मुद्दे३१ गुन्हे दाखल स्वच्छता सर्वेक्षणाच्या निमित्ताने कारवाई