मनमाड : येथील रेल्वेस्थानकावर व धावत्या रेल्वेगाड्यांमध्ये अनेक वर्षांपासून अवैद्य विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ्यांची विक्री केली जात आहे. सदरचे रेल्वेस्थानकांची अवैध व्यवसायातून मुक्तता करावी अशी मागणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मनमाड स्थानकावर तसेच या स्थानकावरून धावणाऱ्या अनेक गाड्यांमध्ये भुसावळ ते इगतपुरी स्टेशनपर्यंत राजरोस अवैध व्यवसायिक खाद्यपदार्थ तसेच शीतपेय, फळे, सुकामेवा, गुटखा, तंबाखू, सिगारेट विक्री करीत आहे. विनापरवाना हा व्यवसाय चालू आहे. चालत्या गाडीमध्ये प्रवाशांवर दादागिरी करत निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विक्री करतात. अनधिकृत व्हेंडरमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवत्तीचे लोकांचा सहभाग आहे. आपापसातील वादांमुळे त्यांच्यात हाणामारी होण्याचे प्रकार घडतात. या अवैध व्यवसायिकांकडून अनेकवेळा पोलीस कर्मचाऱ्यांवरसुध्दा हल्ले करण्यात आले आहेत. भविष्यात मनमाड स्थानकावर गुन्हेगारी कृत्य घडू नये या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी हबीब शेख यांनी निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)एक संशयित ताब्यात मनमाड : येथील निमोण चौफुली तसेच सानप कॉम्लेक्समध्ये एकाच रात्री चार दुकानांचे शटर तोडून चोरी झाल्याच्या घटनेसंदर्भात मनमाड शहर पोलिसांनी समीर शेख निजाम, रा. मालेगाव या संशयिताला अटक केली आहे. त्याच्याकडून अजून काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
मनमाडला अवैध व्यवसाय
By admin | Published: March 04, 2017 12:21 AM