सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटनस्थळ समजल्या जाणाºया श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर आज प्लॅस्टिक मुक्त मोहीम बैठकीसाठी आलेल्या प्रातांधिकाºयांसह तहसीलदारांनीच अवैध मद्यसाठा पकडला. कळवण येथील प्रातांधिकारी तथा सहाय्यक जिल्हा अधिकारी अमन मित्तल, तहसीलदार कैलास चावडे व वनविभागाचे अधिकारी वनक्षेत्रपाल शेख, वनपाल योगीराज निकम, गटविकास अधिकारी बी.डी. बहिरम आले होते. बैठक झाल्यानंतर त्यांना सप्तशृंगगडावरील पोलीस चोकीच्या शेजारी अवैधरीत्या दारू विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच यांनी ग्राहक बनून त्या ठिकाणी जाऊन दारू ची मागणी केली व त्याना तिथे लखन परदेशी नामक व्यक्ती तेथे दारू पिण्यासाठी आला असता त्यानेच मित्तल यांना दारू आणून दिली. अंदाजे ८ ते ९ हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला व त्वरित तहसीलदारांनी पचंनामा करून सुनंदा मोरे व लखन परदेशी यांच्यावर कारवाई करण्यात आली व पोलीस योगेश गवळी, व लाहोरे याच्या ताब्यात देण्यात आले.
सप्तशृंगगडावर प्रांताधिकाºयांनी पकडले अवैध मद्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:35 AM