शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

चंदनपुरी शिवारातून अवैध मद्यसाठा जप्त

By admin | Published: May 22, 2017 1:10 AM

मालेगाव : चंदनपुरी शिवारातून विनापरवाना ५० हजार रुपये किमतीच्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या नगरसेवकासह तिघाना पोलीस पथकाने अटक केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : शहरालगतच्या चंदनपुरी शिवारातून विनापरवाना अवैधरीत्या ५० हजार ४०० रुपये किमतीच्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या सटाणा येथील भाजपा नगरसेवकासह तिघा जणांना पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी मद्यसाठा व वाहन असा एकूण पाच लाख ५० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.शहरालगतच्या चंदनपुरी गावाकडून नामांकित कंपनीची विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक हगवणे, पोलीस हवालदार भूषण खैरनार, संजय गुरव, दीपक वानखेडे, दत्तू देवरे आदिंच्या पथकाने चंदनपुरी शिवारात सापळा रचला होता. यावेळी चंदनपुरी गावाकडून येणाऱ्या चारचाकी कारची (क्र. एमएच १५ एफएफ १६०६) तपासणी केली असता या गाडीत नामांकित कंपनीच्या ५० हजार ४०० रुपये किमतीच्या ३३६ बाटल्या आढळून आल्या. सदर मद्यसाठ्याची विनापरवानगी वाहतूक करणारे भाजपाचे सटाण्याचे नगरसेवक दीपक केदा पाकळे, तसेच पंकज भास्कर येवला (रा. सटाणा), चित्तरंजन मोतीराम नंदाळे, रा. निमगाव (ता. मालेगाव), तुकाराम सीताराम पिंपळसे, रा. मळगाव (ता. सटाणा) या चौघांना अटक करण्यात आली आहे. या चौघांविरुद्ध किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.