दिंडोरी : नाशिक पेठ रोडवरील रामशेज आशेवाडी गावाजवळ ओमनी गाडीत अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांवर दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
शनिवारी रात्रीच्या सुमारास पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली मसोबा नाकाबंदी नाशिक ते पेठ रोडवर पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, पोलीस शिपाई मधुकर बेंडकोळी तसेच होमगार्ड असे नाकाबंदी करीत असताना माहिती समजली. नाशिक ते पेठ रोडवरील आशेवाडी गावाजवळील कमानीजवळ सापळा रचून एका ओमनी गाडीत (क्रमांक एम. एच. १५, इपी ०६७९) सोमनाथ बाबुराव शिंदे (३६) व परसराम काशिनाथ शिंदे (४०, दोघेही राहणार वैदूवाडी म्हसरूळ) हे दोघे जण अवैधरित्या बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना आढळले. त्यांच्याकडे एकूण दारूच्या मुद्देमालासह एकूण १,६०,१९२ रुपये किमतीच्या मुद्देमाल मिळून आल्याने त्यांच्याविरूद्ध अवैध चोरून दारूविक्री, कोरोना विषाणू रोग संदर्भात कलमानुसार दिंडोरी पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
-------------
रामशेज शिवारात अवैध दारू विक्री करणारे वाहनासह ताब्यात घेताना पोलीस उपनिरीक्षक कल्पेश कुमार चव्हाण व पोलीस कर्मचारी. (२४ दिंडोरी १)
===Photopath===
240421\24nsk_26_24042021_13.jpg
===Caption===
२४ दिंडोरी १