शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

मोसम नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा

By admin | Published: January 31, 2016 10:35 PM

द्याने : भूजल पातळी घटण्याची भीती

द्याने : बागलाण तालुक्यातील मोसम नदीपात्रात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने आगामी काळात जलसाठा व भूजल पातळी घटून शेती सिंचनासह तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ मोसम खोऱ्यातील शेतकरी व जनतेवर येण्याची भीती व्यक्त होत आहे.मोसम नदी बागलाण तालुक्यातील मोसम खोऱ्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. या नदीच्या स्रोतामुळे नदीकाठी मोठ्या प्रमाणात गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. त्या विहिरींच्या काही फुटाच्या अंतरावर अवैध वाळू उपसण्याचा गंभीर प्रकार राजरोस होत असतानाही संबंधित यंत्रणेचे डोळे बंद का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. द्याने गावाने एकीचे दर्शन घडवत वाळू उपशावर बंदी घातली असून, विहिरीसाठी जागा न देणे असे निर्णय घेतले आहेत. मध्यरात्री वाळू उपसा केला जातो. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानापासून ते नदीपात्रापर्यंत मानवी साखळी उभी केली जाते. अनेकवेळा कार्यवाही होते. वाळूमाफिया बैलगाडीचा वापर वाळू उपसा करण्यासाठी करतात. नामपूर शहराची लोकसंख्या बघता भीषण पाणीटंचाई जाणवत आहे.मोसम परिसरात आत्ताच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील अनेक भागात विहिरींनी तळ गाठला असून, पिण्याच्या पाण्याच्या भीषण समस्येने अनेक ठिकाणी डोके वर काढले आहे. पाण्याच्या या गंभीर समस्येतून मार्ग काढण्यासाठी मोसम नदीचे आवर्तन हाच एकमेव मार्ग आहे. या आवर्तनाचा फायदा नदीकाठच्या गावांना व पाणीपुरवठा योजनांना होतो. परंतु वाळूमाफियांच्या खुलेआम वाळू उपशामुळे मोसम नदीची वाट लागली आहे. नदीत पडलेल्या दहा ते पंधरा फुटांच्या खड्ड्यांमुळे विहिरींची पाण्याची पातळी घटत चालली आहे. वाळू उपशामुळे पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. उपशाचा हा काळा धंदा नदीपात्रात असाच सुरू राहिल्यास आगामी काळात गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. कारण यावर्षीही पावसाचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत फारच कमी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत आहे. त्यास शेतकरी व ग्रामस्थांनी वारंवार विरोध करूनही पुन्हा वाळूचा उपसा अवैधरीत्या चढ्या दराने राजरोसपणे होत आहे. हा प्रकार प्रशासनापासून लपलेला नाही. हे सर्व माहीत असताना प्रशासकीय कर्मचारी या उपशाविरुद्ध कडक कारवाई करीत नसल्याने त्यांची मूकसंमती असल्याचे म्हटले जात आहे. रात्री ट्रॅक्टरमध्ये वाळू भरण्यास विरोध केला असता कधीकधी वाळूमाफिया दादागिरी करतात; मात्र वाळू उपसा थांबविण्यासाठी महसूल विभाग व पोलीस प्रशासन डोळेझाक करत असल्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांची चांदी झाली आहे. महसूल विभाग व वडनेर खाकुर्डी, नामपूर, जायखेडा पोलीस प्रशासनाने रात्री गस्त घालून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरीवर्ग व नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)