शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

मातोरीत अवैध सॉ मिल उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:04 AM

मागील काही दिवसांपासून अवैधरीत्या मौजे मातोरी शिवारात बेकायदेशीरपणे सॉ मिल सुरू करून तेथे आरायंत्र उभारून वृक्षांच्या लाकूड कापले जात होते.

नाशिक : मागील काही दिवसांपासून अवैधरीत्या मौजे मातोरी शिवारात बेकायदेशीरपणे सॉ मिल सुरू करून तेथे आरायंत्र उभारून वृक्षांच्या लाकूड कापले जात होते. याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शनिवारी (दि.१६) सकाळच्या सुमारास नाशिक पश्चिम वनविभागाच्या प्रादेशिक पथकाने छापा टाकून आरागिरणी उद्ध्वस्त केली.याबाबत वनविभागाच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी, मातोरी शिवारात संशयित आरोपी पांडुरंग मुरलीधर चारोस्कर याने त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागे रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत विनापरवाना लाकूड कापण्याची आरागिरणी सुरू केली होती. या आरागिरणीमध्ये मोठमोठ्या वृक्षांच्या फांद्या, बुंध्यांची कापणी केली जात होती. यासाठी संशयित चारोस्कर याने १६ इंची करवत (ब्लेड) असलेले उभे आरायंत्रदेखील उभारले होते. या उभ्या आरायंत्रामार्फत सर्रासपणे लाकडांची कापणी येथे मागील काही महिन्यांपासून केली जात होती. याबाबत वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी सहायक वनसंरक्षक गणेश झोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मधुकर गोसावी, अनिल अहिरराव, शांताराम भदाणे, ओंकार देशपांडे, वनरक्षक राजेंद्र ठाकरे, सचिन अहिरराव, उत्तम पाटील, रोहिणी पाटील, वर्षा पाटील यांच्या पथकाने आरागिरणीवर सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास धाड टाकली. यावेळी संशयित चारोेस्कर हा राहत्या घरी आढळून आला नाही. आजूबाजूला वनकर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता तो बाहेरगावी गेला असल्याचे समजले. पथकाने आरायंत्र, १ इलेक्ट्रिक मोटारसह संपूर्ण सांगाडा असा एकूण ५० ते ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वर्षभरापूर्वीही चारोस्करविरुद्ध गुन्हा१३ डिसेंबर २०१८ साली चारोस्करविरुद्ध याच पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारोस्करने तेव्हाही बेकायदेशीररीत्या आरायंत्र उभारून तोडलेल्या लाकडांची कापणी करण्याची गिरणी चालविली होती. वनविभागाने छापा टाकून त्याचे संपूर्ण साहित्य जप्त केले होते. यानंतर पुन्हा चारोस्करकडून गिरणी सुरू करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. आठ ते दहा महिन्यांपूर्वी वनविभागाकडून कारवाई करण्यात येऊनदेखील पुन्हा चारोस्करने नेमक्या कोणाच्या वरदहस्ताने अवैधरीत्या व्यवसाय सुरू केला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.लाकडांचापुरवठादार कोण?चारोस्करच्या आरागिरणीत बेकायदेशीरपणे लाकडांचा पुरवठा करणारा पुरवठादार शोधण्याचे आव्हान आता वनविभागापुढे आहे. जिल्ह्यातील नेमक्या कुठल्या भागात अवैध वृक्षतोड केली जात होती, याचा तपास वनविभाग करत आहेत.

टॅग्स :forest departmentवनविभागNashikनाशिक