इगतपुरी तालुक्यातून वृक्षांची तोड करून बुंधे, मोठ्या फांद्या असा जळाऊ लाकडाचा माल एका आयशर ट्रकमधून (एम.एच.१५ एजी ४६००) अवैधरित्या शहरात आणला जात असल्याची गोपनीय माहिती नाशिक वनविकास महामंडळाच्या गस्तीपथकाला मिळाली. वनक्षेत्रपाल प्रवीण डमाळे यांनी त्वरित घोटी वनपरिक्षेत्राचे वनपाल राहुल वाघ, दीपक बोरसे, वनरक्षक सुनील बोरसे, पंकज पाटील यांच्या पथकाला वाहनाचे वर्णन सांगून पाठलाग करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाला घोटीजवळ अवैधरित्या लाकडाची वाहतूक करणारा आयशर ट्रक नजरेस पडला. पथकाने तेथून या ट्रकचा पाठलाग पहाटे साडेचार वाजेपासून सुरू केला. मात्र, ट्रकचालकाने कुठल्याही प्रकारे दाद न देता वाहनाचा वेग कमी केला नाही. गरवारे पाॅइंट चौफुली येथे वाहनचालकाचा गोंधळ उडाल्याने पथकाने टाटा सुमो गाडी आडवी उभी करून ट्रक रोखला. ट्रकची ताडपत्री उघडून झडती घेतली असता ट्रकमध्ये सुमारे दहा टन इतका लाकडाचा माल आढळून आला.
--इन्फो--
८० वृक्षांची कत्तल अन् चोरटी वाहतूक
सादडा, जांभुळी, किन्नई या प्रजातींची सुमारे ८० झाडांची तोड करून त्याचे लाकूड वाहून नेले जात असल्याचे आढळून आले. सुमारे २१ हजार रुपये किमतीचा हा माल असल्याचे डमाळे यांनी सांगितले. संशयित ट्रकचालक विष्णू भगवान कडाळे (रा. ठाणापाडा), काकड गावित, बापू सीता दळवी (दोघे रा. कपराडा, जि. बलसाड) यांना अटक केली आहे. प्रादेशिक व्यवस्थापक प्रकाश मोराणकर यांच्या आदेशान्वये पुढील कारवाई सुरू असून, ही वृक्षतोड मालकीच्या जागेत झाली की, वनजमिनीवर याचा तपास पथकाकडून केला जात आहे.
--
फोटो आरवर २३फॉरेस्ट नावाने सेव्ह केला आहे.