नाशिक : अपुऱ्या संवादाचा अभाव, संकुचित मानसिकता आणि वैद्यकीय व्यवसायातून हरवत जाणारी नीतिमूल्ये यामुळे समाजासोबत वैद्यकीय पेशाची अपरिमित हानी होत आहे. सेवेशी संबंधित असलेल्या या पेशातून नीतिमूल्यांचे भान बाळगल्यास डॉक्टर-रुग्ण यांच्यातील ताणलेले नातेसंबंध अधिकाधिक दृढ होण्यास हातभार लागेल, असा सूर चर्चासत्रातून उमटला.इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) वतीने शालिमार येथील सभागृहात ‘डॉक्टर-रुग्ण नातेसंबंध’ या कार्यक्रमाचा समारोप ‘सुरक्षित डॉक्टर-सुरक्षित रुग्ण’ या विषयावरील चर्चासत्राने रविवारी (दि.१८) करण्यात आला. यावेळी चर्चासत्रात पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, अॅड. एम. वाय. काळे, डॉ. एस. के. सिंगल, डॉ. अमोल अन्नदाते, डॉ. मनोज चोपडा, डॉ. बी. एस. वी. प्रसाद, डॉ. कविता गाडेकर, नियोजित अध्यक्ष डॉ. आवेश पलोड यांनी सहभागी होत डॉक्टर व रुग्णांची सुरक्षितता याविषयी मंथन केले.
आयएमए नाशिक : डॉक्टर-रुग्णातील विश्वास जोपासावा चर्चासत्रातील सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 8:53 PM
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) वतीने शालिमार येथील सभागृहात ‘डॉक्टर-रुग्ण नातेसंबंध’ या कार्यक्रमाचा समारोप ‘सुरक्षित डॉक्टर-सुरक्षित रुग्ण’ या विषयावरील चर्चासत्राने रविवारी (दि.१८) करण्यात आला.
ठळक मुद्दे ‘सुरक्षित डॉक्टर-सुरक्षित रुग्ण’ या विषयावर चर्चासत्रडॉक्टर व रुग्णांची सुरक्षितता याविषयी मंथन