नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारी (दि.२२) वैज्ञानिक आविष्कारांच्या ‘आयईटी कर्मवीर एक्स्पो’चे उद्घाटन झाले असून, या एक्स्पोच्या माध्यमातून देशभरातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लक्षवेधी वैज्ञानिक आविष्कारांनी नाशिकच्या विज्ञानप्रेमींना भुरळ घातली.कर्मवीर एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी उद्योजक हरिशंकर बॅनर्जी यांनी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना युवकांनी संशोधनावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.यावेळी प्रमुख पाहुणे अनंत वाघचौरे यांच्यासह धीरज मेथीकर, रवींद्र वाडीकर, गणेश उशीर, दिनेश शिरसाट, अजित पाटील, प्रसाद जोशी, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, विश्वस्त समीर वाघ, प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर उपस्थित होते. मुख्य परीक्षक डॉक्टर ओ. जी. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार करून आव्हान स्वीकारावे व पेटंट संदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर पोस्टर स्पर्धा, चलतयंत्र स्पर्धा, मेगर कंपनीच्या ‘सेंटर आॅफ एक्सलन्सचेही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत राज्यातील विविध महाविद्यालयांच्या ११० संघांसह मध्य प्रदेश चार, कर्नाटक दोन, तामिळनाडू एक व गुजरातचे दोन संघ सहभागी झाले असून, सुमारे सहाशे त सातशे विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला आहे. प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर, विद्युत विभागप्रमुख डॉ. बी. ई. कुशारे यांनी स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी मार्गदर्शन केले.नेक्स्ट जनरेशन सिटी प्रात्यक्षिकातून स्मार्ट ऊर्जानिर्मितीची संकल्पनासामनगाव येथील शासकीय तंत्रनिके तन महाविद्यालय नाशिकच्या विद्यार्थ्यांनी नेक्स्ट जनरेशन सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून प्रदूषण विरहित ऊर्जानिर्मितीची संक ल्पना या प्रदर्शनात मांडली आहे. विद्यार्थ्यांनी प्रदूषण विरहित ऊर्जानिर्मितीसाठी सोलर ट्रीचा प्रयोग केला असून, शहरातील रस्त्यांवर विशिष्ट प्रकारचे सोलर पॅनल बसवून ऊर्जानिर्मिती शक्य असल्याचा प्रयोग त्यांच्या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सादर करून दाखविला. त्यासोबतच गतिरोधकाच्या माध्यमातूनही ऊर्जानिर्मिती करणे शक्य असल्याचा विद्यार्थ्यांनी या प्रात्यक्षिकातून दावा केला आहे. विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेल्या या नेक्स्ट जनरेशन सिटीच्या रस्त्यांवरून जाता इलेक्ट्रिक वाहने आपोआप चार्ज होण्याची यंत्रणाही विकसित क रण्याची संकल्पना मांडली असल्याने या प्रात्यक्षिकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.क. का. वाघ महाविद्यालायची ‘फोल्डिंग व्हेइकल’कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयातील अंतिम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक फोल्डिंग व्हेइकल (सायकल) तयार केली आहे. हे वाहन जवळपास ९५ किलो वजनासह ताशी २० ते २३ किमी प्र्रति तास वेगाने चालत असल्याने आणि सोयीनुसार तिची घडी करणे शक्य असल्याने ज्येष्ठ नागरिक सहजरीत्या तिचा वापर करू शकतात, असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. शिवाय वाहनाला सुटकेसप्रमाणे चाके असून प्रवासात ते वाहनाला बॅलन्स करतात, तर घडी घातल्यानंतर हे वाहन सोबत बाळगनेही या चाकांमुळे सोयीचे होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह प्रत्येकासाठी ही गाडी अतिशय उपयोगी असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. या वाहनाचे प्रात्यक्षिक सुयश दिघे, शिवांजली गुंजळ, अभिषेक भागवत व पुष्पक पाटील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सादर केले आहे.
वैज्ञानिक आविष्काराला कल्पनाशक्तीचे पंख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:59 AM