नाशिक : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अंतर्गत जिल्ह्णातील विविध कारणांमुळे रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांचा आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सविस्तर आढावा घेतला. योजना अपूर्ण राहण्यास कारणीभूत ठरलेल्या सर्व संबंधितांवर कार्यवाही करण्याच्या सूचना देतानाच योजनेत गैरव्यवहार, अपहार आढळल्यास तत्काळ फौजदारी कार्यवाही करण्याचे निर्देश डॉ. गिते यांनी दिले.जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या या आढावा बैठकीसाठी संबंधित तालुक्यांचे गट विकास अधिकारी, उपअभियंता, शाखा अभियंता, संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे सचिव, योजनेसाठी नेमलेले मक्तेदार, तांत्रिक सल्लागार यांना बोलावण्यात आले होते.जिल्ह्णात अनेक योजना विविध कालावधीपासून रखडल्या असून, त्यांचे अंतिमीकरण झालेले नाही. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाणीपुरठा समितीमधील अंतर्गत वाद, हागणदारीमुक्त गावाची अट, ठेकेदाराने केलेले अपूर्ण बांधकाम, दप्तर देण्यास टाळाटाळ आदी कारणांमुळे पाणीपुरवठा योजना अपूर्ण राहिल्या आहेत. कोट्यवधींचा निधी देऊनही योजना रखडत असल्याने अपूर्ण कामाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यासंदर्भात बैठकीत सर्व संबंधितांकडून लेखी माहिती घेण्यात आली. सर्व योजनाचे मूल्यांकन अंतिम करण्याचे तसेच वसूलपत्र रक्कम वसूल करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.दरम्यान, वारंवार सूचना देऊनही घरकुलांची कामे पूर्ण न करणाऱ्या अकार्यक्षम ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचे आदेश गट विकास अधिकाºयांना देण्यात आले.आढावा बैठकीस ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बोधीकीरण सोनकांबळे, कार्यकारी अभियंता पुरु षोत्तम ठाकूर आदी उपस्थित होते.
पाणीपुरवठ्यात गैरव्यवहार झाल्यास तत्काळ फौजदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 11:21 PM
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अंतर्गत जिल्ह्णातील विविध कारणांमुळे रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांचा आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सविस्तर आढावा घेतला. योजना अपूर्ण राहण्यास कारणीभूत ठरलेल्या सर्व संबंधितांवर कार्यवाही करण्याच्या सूचना देतानाच योजनेत गैरव्यवहार, अपहार आढळल्यास तत्काळ फौजदारी कार्यवाही करण्याचे निर्देश डॉ. गिते यांनी दिले.
ठळक मुद्देगिते यांचा इशारा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा आढावा