यंदा फळांचा राजा आंब्यालाही चांगली मागणी राहिली. आजही आंब्याचे दर प्रतिकिलो १०० रुपयांच्या आसपास आहेत. कोरोना आणि अवकाळी पावसाचा फटका आंब्यालाही बसला, तसाच तो जांभूळ पिकालाही बसला आहे. पावसाळ्यात पौष्टिक समजल्या जाणाऱ्या जांभूळ फळाला चांगली मागणी असते. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटच्या सत्रात व जून महिन्यात जांभूळ फळाला चांगला बहर येत असतो; परंतु यंदा वातावरणातील बदल व अवकाळी पाऊस यामुळे कमी प्रमाणात बहर आल्याने बाजारात जांभळाची आवक कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे मागणी वाढत असल्याने दरही वाढत आहेत. शरीरातील जीवनसत्व वाढविण्यासाठी हे फळ प्रभावी मानले जाते, तसेच पावसाळ्यात हे फळ खाणे म्हणजे आजारपणाला दूर ठेवणे होय. सध्या दिंडोरी ते वणी, सप्तशृंगी गड परिसरातील रस्त्यावर जांभळांची छोटी छोटी दुकाने प्रवासी वर्गाचे आकर्षण ठरत आहेत.
इन्फो २० किलोची जाळी ९०० रुपये
दरवर्षी जांभूळ फळ मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत येते. यंदा हवामानातील बदल व कोरोनामुळे ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद झाल्याने जांभूळ फळांची आवक अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. सध्या फळांचा दर्जा पाहून २० किलो जाळीला ८०० ते ९०० रुपयांपर्यंत भाव मोजावा लागत आहे.
कोट....
आम्ही दरवर्षी भरपूर मोठ्या प्रमाणात जांभूळ फळांचे पीक घेतो; परंतु मागील हंगामापासून वातावरणातील बदलामुळे झाडावर फळधारणा कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. यंदाही कमी प्रमाणात फळ हातात पडत आहे. त्यामुळे शेतीसाठी मिळणारे भांडवलही कमी प्रमाणात मिळत आहे.
- पांडुरंग गावित, जांभूळ उत्पादक शेतकरी
फोटो- २६ जांभूळ
===Photopath===
260621\125626nsk_26_26062021_13.jpg
===Caption===
फोटो- २६ जांभूळ