शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

कांदा खरेदी-विक्री व्यवहारावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 12:01 AM

मजुरांची अडचण व परराज्यात कांदा पाठविण्यासाठीची वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने कांदा खरेदी-विक्री व्यवहारप्रणाली पूर्ण करण्यासाठीच्या समस्या व्यापारीवर्गासमोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे खरेदी-विक्र ी मंदावली आहे.

ठळक मुद्देआवक घटली : मजुरांची अडचण; वाहतूक सुविधा नाही

वणी : मजुरांची अडचण व परराज्यात कांदा पाठविण्यासाठीची वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने कांदा खरेदी-विक्री व्यवहारप्रणाली पूर्ण करण्यासाठीच्या समस्या व्यापारीवर्गासमोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे खरेदी-विक्र ी मंदावली आहे. कोरोनामुळे कांद्याची आवक अत्यल्प प्रमाणात झाल्याने आर्थिक व्यवहारावरही परिणाम झाला आहे.वणी उपबाजारात कांद्याची किमान सात ते दहा हजार क्विंटल आवक या महिन्यात होते. दिंडोरी, चांदवड, कळवण, देवळा या भागातील उत्पादक कांदा विक्र ीसाठी आणत असतात. मात्र या वर्षी कोरोनाने कांद्याचे संपूर्ण गणित बदलुन टाकले आहे. लाखो रु पयांची उलाढाल होऊन अनेक लोकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हायचा, त्यावर आता कोरोनामुळे बंधने आली आहेत. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर तर कांद्याची अत्यल्प आवक होत आहे. बुधवारी (दि.१) दहा वाहनांमधून अवघा तीस क्विंटल कांदा विक्र ीसाठी आणण्यात आला होता. तेराशे ते पंधराशे रु पये क्विंटल दराने कांदा खरेदी करण्यात आला. उन्हाळ कांदा साठवणुकीची ही वेळ आहे; मात्र मजुरांअभावी व्यापारीवर्ग हतबल झाला आहे, तर कांदा खरेदी करु न परराज्यात पाठविण्याची वेळ येते तेव्हा अडचणी उभ्या ठाकतात. परराज्यात कांदा नेण्यासाठी परराज्यातील वाहतूक व्यवस्थेचा आधार घ्यावा लागतो. खासगी वाहतूक व्यवस्थेच्या ट्रक कांदा खरेदीसाठी येत असत. मात्र त्या वाहतुकदारांनी नकारघंटा वाजविली आहे तसेच जिल्ह्यातील वाहतूकदारांच्या ट्रक परराज्यात पाठविण्यास ट्रान्सपोर्ट मालक तयार नाहीत त्यामुळे व्यापाऱ्यांना कांदा खरेदी केला तर तो परराज्यात पाठवायचा कसा, असा प्रश्न पडला आहे.तसेच कांदा खरेदी केल्यानंतर प्रतवारी करणे, गोण्यांमधे कांदा भरणे, गोण्या शिवणे, ट्रकमध्ये त्या गोण्या टाकणे यासाठी मजुरच मिळत नाही. लॉकडाऊनमुळे मजुरांनीही घरातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्यापारीवर्ग पुरता हतबल झाला असल्याची माहीती कांदा व्यापारी संजय ऊंबरे यांनी दिली.कांदा खरेदी केला तर तो साठवावा कसा, विक्र ी करावा कसा व परराज्यात व परदेशात पाठवावा कसा, या प्रश्नांची उत्तरे मिळणे दुरापास्त झाली आहेत. कांदा खरेदीबाबत वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका काहीनी घेतली आहे, तर बोटावर मोजण्याइतक्या व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करु न विक्र ी करण्याची मानसिक तयारी केली आहे.बाजार समितीचे धोरण, अटी व नियमांचे पालन करु न व्यवहार सुरळीत राहावे असेच आहे. त्यासंदर्भात कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन कृषी उत्पादित मालांच्या अडचणीबाबत माहिती देऊन समस्येचे निराकारणाची विनंती करण्यात आल्याची माहिती दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रेय पाटील यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याonionकांदा