शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

कारभारी परिचय धोरण राबवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 12:53 AM

नाशिक : सरपंचांना अनेक अडचणी असतात; परंतु त्यांनी त्यावर मात करून पुढे जायचे असते. त्यांना संघटनात्मक काम उभे करायचे आहे. सरपंचांचे प्रश्न मांडणारी ताकदवान अशी संघटना नाही. त्यामुळे सरपंचांनी गावच्या गरजा ओळखून काम केले पाहिजे. सरपंचांसाठी कारभारी परिचय धोरण राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महिलाराज सत्ता आंदोलनाच्या अमरावती विभागीय समन्वयक आणि यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या माजी सरपंच अर्चना जतकर यांनी बोलताना केले.

ठळक मुद्देअर्चना जतकर : सरपंचांच्या जबाबदाऱ्यांवर केले विवेचन

नाशिक : सरपंचांना अनेक अडचणी असतात; परंतु त्यांनी त्यावर मात करून पुढे जायचे असते. त्यांना संघटनात्मक काम उभे करायचे आहे. सरपंचांचे प्रश्न मांडणारी ताकदवान अशी संघटना नाही. त्यामुळे सरपंचांनी गावच्या गरजा ओळखून काम केले पाहिजे. सरपंचांसाठी कारभारी परिचय धोरण राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महिलाराज सत्ता आंदोलनाच्या अमरावती विभागीय समन्वयक आणि यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या माजी सरपंच अर्चना जतकर यांनी बोलताना केले.सरपंचांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांचे हक्क याबाबत विवेचन करताना जतकर म्हणाल्या, अनेक सरपंचांना त्यांच्या कारभाराची माहिती नसते. अंदाजपत्रक कसे बनवावे, हे माहिती नसते. त्यासाठी सरपंचांनी सजग राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.सरपंचांना हवे प्रशिक्षणसरपंचांना निवडून आल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र, ओळखपत्र मिळाले पाहिजे. त्यांचा शपथविधी झाला पाहिजे. सरपंच झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे; परंतु आपण केवळ अनुभवावरच शिकत पुढे जात असतो. आजही अनेक गावात ग्रामसेवकराज आहे. अनेक महिला सरपंचांनी चांगले काम करून दाखविले आहे. शिक्षण नसतानाही त्यांनी गावाला पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरपंच प्रतिनिधी म्हणून एकही आमदार नाही. दुखणे आपले असते; परंतु मांडणारे दुसरेच असतात. सरपंचांना तुटपुंजे मानधन मिळते. त्यांना मीटिंग भत्ता वेळेवर मिळत नाही. त्यांना आपल्या प्रश्नांसाठीच झगडावे लागते, असे सांगत जतकर यांनी सरपंचांना व्यासपीठ मिळवून देणाºया लोकमतचे कौतुक केले.