दिंडोरी : भारतातील शेती आणि कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होणे गरज चे आहे, जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी कृषी क्षेत्रात नेतृत्वाबरोबरोबरच व्यवसायिक व्यवस्थापन महत्वाचे असल्याचे प्रतिपादन डॉ. अशोक दलवाई यांनी केले. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आज शेतकरी संघटित होत आहे आणि त्यातून गावाचं चित्र बदलताना दिसत आहे, आणि ही नक्कीच सकारात्मक बाब असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रीय अवर्षण -प्रणवक्षेत्र प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अशोक दलवाई यांनी सह्याद्री फार्म येथे भेट दिली असता केले. अमूलच्या उभारणीतून डॉ वर्गीस कुरियन यांनी केलेल्या दुधातील क्र ांतीची आठवण करताना त्यांनी याची पुनरावृती महाराष्ट्रात होण्यासाठी अशा प्रकारे पीकनिहाय नेतृत्व तयार होणे गरजेचे असल्याचे सांगितले. नेतृत्व निर्माण झाल्यानंतर त्यांनी व्यावसायिक दृष्ट्या त्याचे व्यवस्थापन केले तरच अमूल सारखे अथवा सह्याद्री सारखे चांगले प्रकल्प उभे राहून कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होऊ शकत असल्याचे प्रतिपादन केले. डॉ कुरियन यांच्याबरोबर केलेल्या कामाच्या आठवणींना उजाळा दिला.
कृषी क्षेत्रातील बदलासाठी व्यावसायिक व्यवस्थापन अंगीकारणे महत्वाचे - अशोक दलवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 12:58 PM