नाशिक : कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नसल्याची वस्तुस्थिती असली तरी कोरोनाशी लढताना दुसरीकडे अर्थचक्रदेखील सुरू राहिले पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन केले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्र्यांनी जाहीर केल्याने लॉकडाऊन होण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, नागरिकांनी भीती न बाळगता दैनंदिन व्यवहार सुरू ठेवताना नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले.जिल्हा आणि शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत कोराना विषयावर चर्चा करण्यात आली. कोरोनाशी लढताना नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्नदेखील सुटला पाहिजे यासाठी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. त्यामध्ये आता बदल होणार नाही. अर्थचक्र सुरू राहिले पाहिजे हा प्रमुख उद्देश असून दैनंदिन व्यवहारातून रोजगार आणि त्यातून उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटावा ही यामागची भूमिका आहे. त्यामुळे अर्थचक्र थांबता कामा नये, करोनाशी लढता लढता अर्थचक्राला चालना देण्याची भूमिका असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक आरती सिंग उपस्थित होते.
-------------जिल्हा रुग्णालयात लॅबसाठी प्रयत्नरुग्णवाढीची संख्या लक्षात घेता जिल्हा रुग्णालयातदेखील कोविड टेस्टिंग लॅब तयार करण्याचा विचार शासनाकडून सुरू झाला आहे. मविप्र वैद्यकीय महाविद्यालय येथे एक लॅब असली तरी शासनाच्या प्रयोगशाळेसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.-----------------सरकारी रुग्णालयात खाटा राखीव ठेवणाररुग्णवाढीचा वेग लक्षात घेता आगामी नियोजनावर बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार एचएएल तसेच आयएसपी रुग्णालयांच्या खाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत.------------अर्थचक्र सुरू ठेवावेच लागेल, बाजारातील अर्थचक्र फिरले तरच व्यवहाराला चालना मिळेल. मालेगावातील पॉवरल्यूम सुरू झाल्याने तेथील अर्थचक्र ग्ाितमान झाले आहे.लॉकडाऊनची मागणी करणाऱ्या नागरिकांनीच लॉकडाऊन नियमांचे पालन केले तर कोरोनाची लढाई लढता येईल.कोरोनाची भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. कुणावरही फिरण्याचे बंधन नाही. मात्र बाजारात, पर्यटनाला जाताना मात्र सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करा.कोरोना आहे, लॉकडाऊन नाही हे नागरिकांनी समजून स्वत:ची काळजी घेतली पाहिजे.केवळ घरात राहून इम्युनिटी कशी वाढेल? चालले, फिरलेही पाहिजेच.नुसते गहू, तांदूळ देऊन चालणार नाही. मीठ, मिरची, तेल या अन्य वस्तूंसाठी पैसे लागतात, त्यासाठी बाजारात उलाढाल होऊ द्यावी लागेल.रुग्णसंख्या वाढली की लॉकडाऊन आणि कमी झाली की शिथिलता असे चालणार नाही. नागरिकांना स्वयंशिस्त पाळावी लागेल.