पोलीस आयुक्तालयांतर्गत गुन्हेगार सुधार योजना-२०२१ राबविण्यास मंगळवारी (दि.२२) सुरुवात करण्यात आली. या औचित्यावर नाशिक रोड पोलीस ठाण्यात संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमात पाण्डेय यांनी उपस्थित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना त्यांच्या खास शैलीत सुधारण्याची संधी असल्याचे बजावून सांगितले. यावेळी उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त नवलनाथ तांबे, समीर शेख, मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, अनिल शिंदे, कमलाकर जाधव यांच्यासह आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, पाण्डेय म्हणाले, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. गुन्हेगार सुधार योजनेकडे एक संधी म्हणून बघावे आणि आपले वर्तन सुधारून स्वत:सह कुटुंबीयांचेही आयुष्य सुखी, आनंदी करण्यावर भर द्यावा. यावेळी उपस्थित गुन्हेगारांनी आपल्या जीवनातील व्यथा मांडल्या. यावेळी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २६, उपनगरचे १६, देवळाली कॅम्पचे २० असे एकूण ६२ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले व्यक्तींनी हजेरी लावली.
--इन्फो--
पालकांची कळकळ लक्षात घ्या
बहुतांश गुन्हेगारांचे कुटुंबीयांनी माझी भेट घेत आमच्या मुलांना सुधारण्याची संधी द्यावी, असे पोटतिडकीने सांगत होते. त्यामुळे कायद्याच्या अभ्यास करत ही योजना राबविण्याचा प्रयोग सुरू केल्याचे पाण्डेय यांनी सांगितले. गुन्हेगारी रोखण्यासोबत गुन्हेगारांचे वर्तन सुधारणा करणेदेखील पोलिसांचे एक कर्तव्य असून पोलिसांनी पुन्हा त्यादिशेने एक पाऊल टाकले आहे. त्यामुळे गु्न्हेगारीमध्ये अनावधानाने आलेले किंवा आणले गेलेल्या गुन्हेगारांनी कायमस्वरूपी यामधून पावले मागे घ्यावे, असेही ते म्हणाले.
===Photopath===
220621\0230365722nsk_43_22062021_13.jpg
===Caption===
गुन्हेगार सुधार योजना