नाशिक (सुयोग जोशी : मागील तीन वर्षापासून सिटी बसचालकांना नाममात्र पगार दिला जात होता, वारंवार मागणी करूनही सिटीलिंक व्यवस्थापन व सिटीबस डेपो व्यवस्थापन हे मागण्यांकडे दुर्लक्ष करत होते. अखेर कामगारांनी हक्कासाठी संप पुकारताच व्यवस्थापन खडबडून जागे झाले व कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक विचाराचे अश्वाषण दिले. त्यामुळे तूर्तास संप स्थगित करण्यात आला आहे. दि.१२जुलै रोजी रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना शिष्टमंडळ, सिटीलिंक व्यवस्थापक मिलिंद बंड व कंत्राटी कंपनीचे व्यवस्थापनाची यांची चर्चा सुरु होती.
शहरातील नागरिकांना, विद्यार्थांना,वृद्ध लोकांना कोणत्याही त्रास होणार याबाबत एकविचाराने कामगारांच्या समस्यावर तोडगा काढण्यात येईल. कंपनी प्रशासन गांभीर्याने विचार करत असून १० दिवसांची मुदत मिळावी अशी मागणी मनसे जिल्हा अधक्ष्य अंकुश पवार यांच्याकडे करण्यात आली. पुढील १५ दिवसात पगार वाढ,प्रती किलोमीटर प्रवास दरवाढ, डबलड्युटी ओव्हरटाइम व इतर मागण्या चा निर्णय घ्या इतर अधिकाऱ्यांना अधिक पगार असताना कामगारांना तुटपुंजा पगार कोणत्याही परिस्थितीत मान्य केला जाणार अशी रोख ठोक भूमिका पवार यांनी केली.सदर चर्चेत सकारात्मक निर्णय घेऊ व नाशिकरांना अखंड बस सेवा देवू याकरता उपाययोजना मिलिंद बंड यांनी सुचवल्या. मिटिंगमध्ये कामगार प्रमुख दिनेश खैरनार,किरण सांगळे व्यवस्थापक राजीव शिंदे, गिरीश संघवीकर व कामगार उपस्थित होते.