शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
2
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु
4
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
5
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
6
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
7
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
8
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
9
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 
10
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
11
"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?
12
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
13
क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत
14
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?
15
"ती माझ्याशी लग्न करत नव्हती आणि मलाही..."; जिम ट्रेनरने सांगितली हत्येची Inside Story
16
कोण आहे सोफिया सीव्हिंग, जिने पहिलीवहिली पिकलबॉल स्पर्धा जिंकून रचला इतिहास (Photos)
17
५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार
18
झारखंड: हेमंत सोरेन यांच्याविरोधात भाजपाने उमेदवार उतरविला; २०१९ ला होती केवळ २५०० मते
19
Sharmila Thackeray : "लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
20
"...तर माझी कधीही हत्या होऊ शकते’’, लॉरेन्स गँगच्या धमकीनंतर पप्पू यादवांचं गृहमंत्रालयाला पत्र 

मिरची चौकात लक्झरी बस व टँकरचा भीषण अपघात; बसला आग, १० प्रवाशांचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2022 6:52 AM

यवतमाळ येथून बस मुंबईकडे जात असताना सदर अपघात घडल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले.

संदीप झिरवाळ, नाशिक: औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस व टँकर यांच्यात शनिवारी (दि.8) पहाटे सव्वा पाच वाजता झालेल्या भीषण अपघातात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्याने बस मधील जवळपास अकरा प्रवासी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिक महापालिका आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यासंदर्भातील प्राथमिक माहिती दिली आहे. यवतमाळ येथून बस मुंबईकडे जात असताना सदर अपघात घडल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले.

घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन ते चार वाहने तसेच चार ते पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या साधारणपणे अर्धा तासाहून अधिक काळ पेटलेली बस भिजवण्याचा प्रयत्न सुरू होता. बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आले, त्यांनी उड्या मारल्या तर आगीमुळे प्रवासी जळून खाक झाले.

सदर अपघातानंतर बस 50 ते 60 फूट पुढे घसरत गेली तर टँकर 70 ते 80 मीटर पुढे जाऊन थांबला टॅंकरने रस्त्याच्या कडेला थांबला. सदर अपघातात बसने पेट घेतल्याने जळून मयत झालेल्या नागरिकांचे मृतदेह महापालिकेच्या सिटी लिंक बस मधून हलविण्यात आले. अपघात घडल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी नवीन आडगाव नाक्यावर असलेल्या वाहतूक पोलीस चौकी देखील धाव घेतली तसेच पोलिसांना देखील कळविले मात्र पोलीस वेळेच घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

३८ प्रवासी बसमध्ये होते. त्यापैकी १० प्रवशी होरपळून ठार झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे. १० मृत झाले असून सर्व पुरुष असल्याचे प्रशासनाने सांगितले. यामध्ये एक मृतकाची कवटी फक्त आढळून आली. ती लहान मुलाची असू शकते असे पोलिसांनी सांगितले. काही प्रवाशांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ३८ प्रवाशांमध्ये १० महिला, २० पुरुष, ०८ बालके होती अशी माहिती देण्यात आली आहे.

मुंबईला मामा-काकासोबत प्रवास करत होतो. आग लागली तेव्हा जीव घेऊन बसच्या बाहेर पळालो. मामा जखमी झाले आहेत. सगळे गाढ झोपेत असताना हा अपघात घडला.पिराजी धोत्रे(रा. म्हाळुंगी ता.अरणी, जि.यवतमाळ)दैव बलवत्तर म्हणून बचावलोपहाटेच्या सुमारास आम्ही सगळे लक्झरी बस मध्ये झोपलेला असताना अचानक मोठा आवाज झाला आणि बस संपूर्णपणे आगीत सापडली होती. यावेळी कसेबसे मी माझ्या लेकीसह बसमधून जीव वाचून बाहेर पडले माझे नशीब चांगले म्हणून मी आणि माझी लेक बचावलो.अनिता चौधरी,(रा. लोणी, जि.वाशीम)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक