नाशिक : नाशिक तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना दररोजच्या जगण्याचा संघर्ष करता करता मरणानंतरही यातनाच भोगाव्या लागत आहेत. नाशिक तालुक्यातील तब्बल अकरा गावांना अजूनही स्मशानभूमीच नसल्याने गावकऱ्यांनी ‘येथे माणसे मरत नाहीत का’ असा सवाल प्रशासनाला विचारला आहे.नाशिक तालुक्यातील ओझरखेड, गणेशगाव, पिंपळगाव गरुडेश्वर, गोविंदपूर, गंगाम्हाळुंगी, चांदशी, मनोली, वैष्णववाडी, येºयाचा पाडा, राजेवाडी, गाजरवाडी या आदिवासी गावपाड्यावरील रहिवाशांच्या वैकुंठवारीचा मार्ग खडतर बनला आहे. यातील काही गावांना कित्येक वर्र्षांपूर्वी असलेली स्मशानभूमीची केवळ जागाच शिल्लक राहिली आहे. तेथे अद्याप शेड अथवा बांधकाम करण्यात आलेले नाही तर काही गावांना दुसºया गावातील स्मशासनभूमीत अंत्यसंस्कार करावे लागतात.आदिवासी भाग असल्यामुळे तेथील रहिवाशांकडून स्मशानभूमीबाबत कोणताही पाठपुरावा करण्यात आला नसल्याने अशी कितीतरी गावे स्मशानभूमीपासून वंचितच आहेत. ज्या गावांनी पाठपुरावा केला त्यांच्याही प्रयत्नांना वर्षानुवर्ष यश आलेले नाही. यातून प्रशासकीय उदासीनता समोर येते. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात तालुक्यातील काही गावांना जनसुविधा योजनेंतर्गत स्मशानभूमीच्या कामांना मंजुरी मिळालेली आहे. परंतु निधी प्राप्त नसल्याने ही कामे अद्यापही होऊ शकलेली नाहीत.नाशिक तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींकडून स्मशानभूमी नसलेल्या अकरा गावांमधील व्यथा जिल्हा परिषदेत मांडली जात असताना जिल्हा परिषद मात्र केवळ नऊ गावेच असल्याचा दावा करीत आहेत. गावे किती आहेत हा तक्रारीचा मुद्दा नाही तर नागरिकांच्या मूलभूत हक्काचा आणि जनसुविधेचा असताना अधिकाºयांकडून या प्रकरणी गांभीर्य दाखविले जात नसल्याचे यावरून समोर आले आहे.तालुक्यातील अकरा गावांना स्मशानभूमी नाही. जेथे अंत्यविधी केले जातात त्या जागेला स्मशानभूमी म्हणावे का? असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती आहे. ज्या गावांना स्मशानभूमी नाही तेथील लोक मरत नाही का असे म्हणण्याची वेळ आली आहे. प्रशासकीय निर्ढावलेपण इतके वाढले आहे की स्मशानभूमी असलेल्या गावांमध्ये स्मशानभूमीची कामे घेण्यात आलेली नाहीत आणि जेथे स्मशानभूमी आहे तेथे यापूर्वी दहा आणि दुसºयांना पाच लाखांपर्यंत निधी मंजूर केलेला आहे.-हिरामण खोसकर, जिल्हा परिषद सदस्य, नाशिक
दुर्गम भागातील नागरिकांना मरणानंतरही नशिबी यातनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:42 AM