दिंडोरी : नाशिक जिल्हा परिषदेच्या दिंडोरी तालुक्यातील खतवड प्राथमिक शाळा दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, छत कोसळल्यास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी प्राथमिक शिक्षण शासनाच्या समग्र शिक्षा विभागातर्फे शाळा लाखो रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यातून प्रत्येक शाळेच्या मागणीनुसार तालुक्यातील शाळांच्या दुरुस्तीची कामे केली जात आहे. खतवड येथील शाळेचे जुनाट झालेली कौले काढून नवीन पत्रे टाकण्यात आलीआहेत. सदर काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून, वर्गामध्ये शालेय साहित्य, बॅचेस, कपाट, टेबल खुर्च्यांचेदेखील नुकसान झाले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्याचप्रमाणे शेजारी असलेल्या व्यायामशाळेचेदेखील नुकसान केले असून, शालेय आवारातील मोठ्या वृक्ष तोडण्यात आले आहे. सदर बांधकाम ठेकेदारास वारंवार सांगूनदेखील दुर्लक्ष केले जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
खतवड येथे शाळेच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट; ग्रामस्थांचा आरोेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 9:30 PM