लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अकरावी प्रवेशप्रक्रियेसंदर्भात विद्यार्थी आणि पालकांचे पुरेसे प्रशिक्षण झाले नसल्याची बाब स्वत: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक यांची मान्य केले आहे. यासंदर्भात त्यांनी अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करताना बदलत्या परिस्थितीत विद्यार्थी व पालक यांना प्रवेशप्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी उपाययोजना करण्याचे तसेच मार्गदर्शनवर्गांचे आयोजन करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालक कार्यालयांना केल्या आहेत.नाशिकसह मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिचवड, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रांत अकरावीचे प्रवेश केंद्रीय आॅनलाइन पद्धतीने केले जात आहेत. मात्र, या प्रवेशप्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांमध्ये अद्याप पुरेशी जागृती झाली नसून विद्यार्थी व पालकांना पुरेसे प्रशिक्षण दिले गेले नसल्याचे दिसून आले आहे, अशी स्पष्टोक्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून दिली आहे. त्याचप्रमाणे अकरावी प्रवेशप्रक्रियेविषयी आता पुन्हा नव्याने विद्यार्थी व पालक यांना प्रवेशप्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी उपाययोजना करण्यासोबतच विद्यार्थी व पालकांसाठी पुरेशा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालकांना केल्या असून, प्रवेशप्रक्रियेतील ऐनवेळी होणारा गोंधळ टाळण्यासाठी अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेचे सुधारित वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी आॅनलाइन नोंदणी करणे व लॉगीन आयडी मिळविणे व पासवर्ड तयार करण्यासाठी रविवार (दि.२६) सकाळी ११ वाजेपासून संधी उपलब्ध होणार आहे, तर एक आॅगस्टपासून प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर जाऊन मिळालेल्या लॉगीनवू आवड व पासवर्डचा वापर करून अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन अर्जाचा भाग-एक भरणे, शुल्क भरून फॉर्म लॉक करणे. अर्जातील माहिती शाळा मार्गदर्शन केंद्रावरून प्रमाणित करून घेण्याची संधी मिळणार आहे. या कालावधीतही आॅनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रियाही सुरू राहणार आहे. एक आॅगस्टपासून विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती, भाग-१ आॅनलाइन तपासून प्रमाणित करणे अनिवार्य असून, विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग-२ भरण्याबाबतच्या प्रक्रियेचे वेळापत्रक दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर घोषित करण्यात येईल.
विद्यार्थ्यांचे अपुरे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 7:43 PM
नाशिक : अकरावी प्रवेशप्रक्रियेसंदर्भात विद्यार्थी आणि पालकांचे पुरेसे प्रशिक्षण झाले नसल्याची बाब स्वत: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक यांची मान्य केले आहे. यासंदर्भात त्यांनी अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करताना बदलत्या परिस्थितीत विद्यार्थी व पालक यांना प्रवेशप्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी उपाययोजना करण्याचे तसेच मार्गदर्शनवर्गांचे आयोजन करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालक कार्यालयांना केल्या आहेत.
ठळक मुद्देशिक्षण संचालकांची स्पष्टोक्ती। प्रवेशासाठी पुन्हा सुधारित वेळापत्रक