लासलगाव : येथील श्री महावीर ज्युनि.कॉलेजमध्ये नववर्षाच्या प्रथमदिनी वार्षिक क्र ीडा महोत्सवास सुरवात करण्यात आली. या महोत्सवाचे उदघाटन व्यापारी बिपीन ब्रम्हेचा व सामाजिक कार्यकर्ते गोकुळ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून व्यापारी प्रदीप माठा, संजय जांगडा, तुषार देवरे तसेच महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनील आब्बड, जैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे अध्यक्ष महावीर चोपडा, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य राहुल बरडिया व सामाजिक कार्यकर्ते गुणवंत होळकर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रमुख अतिथीच्या हस्ते क्र ीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. खेळाडूंना शपथ देण्यात आली. या कार्यक्र माचे प्रास्ताविक ज्युनि. कॉलेजचे प्राचार्य दिलीप डुंगरवाल यांनी केले. या प्रसंगी गोकुळ पाटील, तुषार देवरे, प्रदीप माठा, सुनील आब्बड यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित खेळाडूंना खेळाचे व व्यायामाचे महत्व सांगितले. या क्र ीडा महोत्सवात खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, रस्सीखेच, क्रि केट, धावणे, संगीतखुर्ची आदी विविध खेळाचे आयोजन करण्यात आले. तसेच पारंपारिक वेशभूषा दिन देखील साजरा करण्यात आला. क्र ीडा महोत्सवाचे संयोजन पर्यवेक्षक मधुकर बोडके, क्र ीडा शिक्षक राजेंद्र बनसोडे व चेतन कुंदे यांनी केले.या कार्यक्र माचे सूत्रसंचालन विद्यार्थीनि स्वराली देवरे हिने केले. तर आभार प्रदर्शन प्रा. मीना धोंडगे यांनी केले. क्र ीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी ज्युनि. कॉलेजचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी मेहनत घेतली.
श्री महावीर ज्युनियर कॉलेजमध्ये वार्षिक क्र ीडा महोत्सवाचे उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 7:38 PM
लासलगाव : येथील श्री महावीर ज्युनि.कॉलेजमध्ये नववर्षाच्या प्रथमदिनी वार्षिक क्र ीडा महोत्सवास सुरवात करण्यात आली. या महोत्सवाचे उदघाटन व्यापारी बिपीन ब्रम्हेचा व सामाजिक कार्यकर्ते गोकुळ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
ठळक मुद्देसर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी मेहनत घेतली.