नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आवारात उभारण्यात आलेल्या दृकश्राव्य व ग्रंथनिर्मिती केंद्र इमारतीच्या नवीन वास्तूचे उद्घाटन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते शनिवारी (दि. ६) सकाळी १०.३० वाजता होणार आहे. कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. माणिक साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कुलगुरू म्हणाले की, विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांची माहिती विद्याशाखानिहाय एकाच ठिकाणी मिळावी या दृष्टिकोनातून तयार केलेल्या किआॅक्सचे, डॉटनेट सिस्टीमवरआधारित विकसित केलेल्या वित्त व लेखा व्यवस्थापन प्रणालीच्या सॉफ्टवेअरचे उद्घाटन व विद्यापीठाच्या राज्यातील विविध व्हर्च्युअल केंद्रांतील विद्यार्थ्यांशी राज्यपाल संवाद साधणार आहेत. याबरोबरच ते ग्रंथालय व माहितीस्रोत केंद्र व कुसुमाग्रज अध्यासनास भेट देणार असल्याचे कुलगुरू डॉ. साळुंखे यांनी सांगितले. यावेळी निरंतर शिक्षण विद्याशाखेचे संचालक डॉ. राजेंद्र वडनेरे, वित्त अधिकारी पंडित गवळी, परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे, डॉ. हेमंत राजगुरू, उपकुलसचिव जयवंत खडताळे, संतोष साबळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
ग्रंथनिर्मिती इमारतीचे शनिवारी उद्घाटन
By admin | Published: June 04, 2015 12:02 AM